काळे कपडे किंवा मास्क घालणाऱ्यांना शपथविधी सोहळ्यात प्रवेश नाही: तानावडे

शपथविधी समारंभाला 60,000 लोकांची उपस्थिती अपेक्षित; श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियमवर होणार शपथविधी सोहळा
Sadanand Tanavade
Sadanand TanavadeDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी सोमवारी तळेगाव येथे होणाऱ्या शपथविधी सोहळ्यासाठी काळा मास्क किंवा काळे कपडे घालू नयेत, असे आवाहन केले आहे. भाजपने प्रादेशिक भाषेत दिलेल्या निमंत्रणात लोकांना सकाळी 10 वाजेपर्यंत कार्यक्रमस्थळी पोहोचण्याचा सल्ला देण्यात आला आहे.(sadanada shet tanavde says Do not wear black masks, dresses at goa cm swearing in ceremony)

Sadanand Tanavade
लुईझिन फालेरोंच्या आदरासाठी मी टीएमसीमध्ये थांबलो; विजय पै यांचा खुलासा

भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे म्हणाले "तळेगाव येथील मेगा इव्हेंटमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या लोकांनी काळा मास्क किंवा काळे कपडे घालू नयेत कारण त्यांना कार्यक्रमाच्या आत प्रवेश दिला जाणार नाही", अशी माहिती त्यांनी दिली.

शपथविधी समारंभाला 60,000 लोकांची उपस्थिती अपेक्षित

प्रमोद सावंत सरकारच्या शपथविधी समारंभाला 60,000 लोकांची उपस्थिती अपेक्षित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपचे प्रमुख नेते सोमवारी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याने बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती समोर येत आहे.

Sadanand Tanavade
'त्या' बेकायदेशीर खाणींवर कारवाई करण्यासाठी केवळ एका अठवड्याचा कालावधी बाकी

गोवा पोलिसांचे जास्तीत जास्त कर्मचारी कार्यक्रमस्थळी आणि परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यासाठी तैनात करण्यात येतील. शुक्रवारी संध्याकाळी सहा बुलेट प्रूफ आणि जॅमर वाहने राज्यात दाखल झाली आहेत. दिल्लीहून (Delhi) आलेल्या बुलेटप्रूफ लँड क्रूझर आणि टोयोटा फॉर्च्युनरचा वापर पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) आणि इतर प्रमुख नेते करतील, अशी माहिती आहे.

श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियमवर होणार शपथविधी सोहळा

मुख्यमंत्री सावंत आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांचा शपथविधी सोहळा सोमवार, 28 मार्च रोजी सकाळी 11 वाजता श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियमवर होणार आहे. या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था, वाहतूक इत्यादींबाबत पोलिस (Police) आणि प्रशासन काम करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com