Goa Theft Dainik Gomantak
गोवा

Goa Theft: मध्यरात्री हॉटेलात घुसले आणि डॉलर्स पळवले! कांपालमध्ये चोरट्यांचा कारनामा; विदेशी पर्यटकांच्या मोबाईल, रोख रकमेवर डल्ला

Campal Hotel Theft: चोरट्यांनी तीन महागडे मोबाईल तसेच अंदाजे ३० हजार रुपयांपर्यंत रोख रक्कम लंपास केली. यामध्ये काही अमेरिकन डॉलर्सचाही समावेश असल्याची माहिती मिळाली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी : कांपाल परिसरातील एका हॉटेलमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी तीन महागडे मोबाईल तसेच अंदाजे ३० हजार रुपयांपर्यंत रोख रक्कम लंपास केली. यामध्ये काही अमेरिकन डॉलर्सचाही समावेश असल्याची माहिती मिळाली आहे.

दोन खोल्यांमध्ये चोरी झाली असून दोन्ही खोल्यांत विदेशी पर्यटक राहत होते. शांत व सुरक्षित म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या परिसरात घडलेल्या घटनेमुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये आणि स्थानिक नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

दरम्यान, पर्यटन सुरक्षेबाबत प्रशासन गंभीर असून रात्रीची गस्ती वाढवली जात आहे. हॉटेल संघटनांशी समन्वय साधून सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

वाढत्या चोऱ्यांमुळे चिंता

याबाबत पणजी पोलीस स्थानकात तक्रार नोंदविण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, हॉटेल व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. कांपालमधील ही घटना एकटी नसून, गेल्या काही वर्षात गोव्यातील पर्यटन क्षेत्रांमध्ये अशाच प्रकारच्या चोरीच्या घटना समोर आल्या आहेत. या प्रकरणात पोलिसांनी सखोल तपासाचे आश्वासन दिले असले तरी, वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे हॉटेल मालक व रहिवासी चिंतेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT