

डिचोली: डिचोलीत एका महिलेचे मंगळसूत्र लांबविण्याची घटना ताजी असतानाच, शहरात एका पिग्मी कलेक्टरकडील पैशांची बॅग हिसकावण्याची घटना घडली. मात्र, स्थानिक युवकांच्या सतर्कतेमुळे भामट्यांचा हा प्रयत्न फसताना एक भामटा कॅश बॅगेसह युवकांच्या तावडीत सापडला, तर दुसरा तावडीतून निसटला.
पकडलेल्या भामट्याची स्थानिकांनी धुलाई करून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. तर त्याचा साथीदार अनुराज याचा पोलिस शोध घेत आहेत. वीस वर्षीय भामट्याचे नाव अमित गुज्जर असे आहे. मूळ मध्य प्रदेश येथील संशयित सध्या म्हापसा परिसरात राहत होता.
ही घटना मंगळवारी भर दुपारी पाजवाडा-लामगाव रस्त्यावर घडली. कॅनरा बँकेचे पिग्मी कलेक्टर रणजीत साखळकर हे पिग्मी कलेक्शन करून पाजवाडा येथील रस्त्यावरून चालत विश्वासनगर-लामगाव येथील आपल्या घरी जात होते. कारेश्वर मंदिराजवळ पोहोचताच दोन संशयितांनी साखळकर यांच्या हातातील पैशांचे बॅग हिसकावली.
हातातील बॅग हिसकावताच भांबावलेल्या रणजीत साखळकर यांनी मदतीसाठी आरडाओरड केली. त्यावेळी शेतमळ्यात बसलेले महादेव धारगळकर, अश्वेक धारगळकर आणि निखिल पाटील या युवकांनी क्षणाचाही विलंब न करता चोरट्यांचा पाठलाग केला. युवकांच्या या प्रयत्नांना यश मिळताना अमित गुज्जर हा संशयित तावडीत सापडला. तर त्याचा साथीदार अनुराज पळ काढण्यात यशस्वी ठरला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.