Pramod Sawant, Damu Naik  Dainik Gomantak
गोवा

Goa BJP: मांद्रेत भाजपचे कमळच फुलणार! मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास; उमेदवार कोण असणार? चर्चा सुरू

CM Pramod Sawant: भाजपच निवडून येऊन मांद्रेत कमळच फुलणार आहे. यासाठीचे प्रचारकार्य मांद्रेतून सुरू केले असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

Sameer Panditrao

हरमल: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील देश घडवण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी साथ द्यायला हवी. राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर व आता मी तेच स्वप्न घेऊन सुराज्य स्थापन करण्यासाठी झटत आहे. २०२७ च्या निवडणुकीत मांद्रे मतदारसंघात भाजपच निवडून येऊन मांद्रेत कमळच फुलणार आहे. यासाठीचे प्रचारकार्य मांद्रेतून सुरू केले असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

मांद्रे जिल्हा पंचायत सभागृहात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. भाजपचा कार्यकर्ता हा प्रथम देश, नंतर पक्ष व त्यानंतर आपण स्वतः असे मानून स्वार्थाची अपेक्षा न करता कार्यरत असतो. मांद्रे मतदारसंघ आमच्या कार्यकर्त्यांच्या चुकीमुळे अवघ्या मतांनी हुकला.

मात्र तो आळस झटकून कार्यकर्त्यांनी बूथ पातळीवर भाजपला मतदान कसे होईल व वाढेल याकडे लक्ष दिल्यास २०२७ च्या निवडणुकीत मांद्रेत भाजपचा विजय पक्का आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. भाजपचे सरकार आणण्यासाठी सरकारच्या योजना तळागाळात पोचवल्या पाहिजेत. स्वयंपूर्ण मित्र प्रत्येक पंचायत खेत्रात असल्याने त्या योजनांचा लाभ तळागाळात पोचवा. ज्येष्ठ, युवा, नारी शक्तीसाठी मनोहर पर्रीकर यांनी गृहआधार, लाडली लक्ष्मी, बचत गटासाठी वीस लाख रुपयांचे कर्ज आदी सुविधा देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

सुराज्य स्थापनेसाठी साथ द्या

मांद्रे मतदारसंघात प्रथमच पोचलो असून मार्गदर्शन नव्हे, तर लेखाजोगा घेण्यासाठी आलो आहे. कार्यकर्ते किती वाढले, कसे कार्य करतात. या विस्तार बैठकीत किती बूथ अध्यक्ष, किती मंडल सदस्य पदाधिकारी आलेत याकडे आपले लक्ष आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेकदा तह केला, तो केवळ स्वराज्य स्थापनेसाठीच. त्या पद्धतीने राज्यात डॉ. प्रमोद सावंत, भाजपला करावा लागतो. भाजप सुराज्य स्थापनेसाठी कटिबध्द आहे. त्यासाठी मनोहर पर्रीकर यांच्या स्वप्नाला साथ द्या, माजी आमदार दयानंद सोपटे व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना साथ द्या, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT