Goa Politics: ''...त्यामुळे आताच युतीबाबत बोलणे अतिघाईचे ठरेल'' ; युरी आलेमाव यांचं विधान!

Yuri Alemao On Opposition Alliance: विरोधी पक्षांनी एकत्र यावे असे राज्यातील जनतेलाही वाटतेय. विधानसभा निवडणुकीला अजून दोन वर्षांचा कालावधी बाकी आहे.
 Yuri Alemao
Yuri AlemaoDainik Gomantak
Published on
Updated on

Opposition Unity In Goa Elections 2027 Yuri Alemao

मडगाव: विरोधी पक्षांनी एकत्र यावे असे राज्यातील जनतेलाही वाटतेय. विधानसभा निवडणुकीला अजून दोन वर्षांचा कालावधी बाकी आहे. त्यामुळे आताच युतीबाबत बोलणे अतिघाईचे ठरेल, असे मत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी व्‍यक्‍त केले.

विधानसभा निवडणुकीला अजून वेळ आहे

प्रसारमाध्यमांनी युतीबाबत केलेल्या प्रश्‍‍नाला उत्तर देताना युरी म्‍हणाले की, विधानसभा निवडणुकीला वेळ असल्याने युतीबाबत बोलण्याची ही योग्य वेळ नाही. पक्षाला जास्तीत जास्त बळकटी देण्‍यासाठी, कार्यकर्त्यांची संख्या वाढविण्‍यासाठी राज्यातील प्रत्येक राजकीय पक्ष प्रयत्‍नशील आहे. अनेकजण काँग्रेस (Congress) पक्षात प्रवेश करण्याच्या विचारात आहेत, असेही ते म्‍हणाले.

 Yuri Alemao
Yuri Alemao: 2047 पर्यंत गोव्यात काही शिल्लक राहील का? युरी आलेमाव यांचा सरकारला सवाल

युरी आलेमाव, विरोधी पक्षनेते

सध्याच्या स्थितीत सर्व विरोधी पक्षांनी एकत्र रहावे असे गोमंतकीय जनतेला वाटतेय. येत्‍या विधानसभा अधिवेशनात सर्व विरोधी पक्ष एकत्रितपणे पुढे येत लोकांचे प्रश्‍‍न मांडतील. विरोधी पक्षनेता या नात्याने राज्याच्या भल्याचा विचार करणे माझे कर्तव्‍य आहे. त्‍यासाठी सर्व विरोधी पक्षांना एकत्र ठेवूनच मार्गक्रमण करणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com