Goa: ख्रिस्ती बहुल मतदारसंघात 'भाजप' पक्ष अजूनही का राहिला परका ? Dainik Gomantak
गोवा

ख्रिस्ती बहुल मतदारसंघात 'भाजप' पक्ष अजूनही का राहिला परका ?

गोव्यात (Goa) भाजप मागची 33 वर्षे रुजला असला, तरी सासष्टीच्या ख्रिस्ती बहुल मतदारसंघात हा पक्ष अजूनही परकाच आहे. त्याची झळ सध्या सत्ताधारी ख्रिस्ती आमदारांना बसत आहे.

सुशांत कुंकळयेकर

मडगाव : गोव्यात (Goa) भाजप मागची 33 वर्षे रुजला असला, तरी सासष्टीच्या ख्रिस्ती बहुल मतदारसंघात हा पक्ष अजूनही परकाच आहे. त्याची झळ सध्या सत्ताधारी ख्रिस्ती आमदारांना बसत आहे. सासष्टीतील नुवे आणि वेळ्ळी या दोन मतदारसंघांत हा धग अधिकच तीव्र आहे.

सासष्टीतील एकमेव मंत्री असलेले फिलिप नेरी रॉड्रिग्स यांनी आपली व्यथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर बोलून दाखवली होती. वेळ्ळी व नुवे या दोन मतदारसंघांत काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडून आलेले रॉड्रिग्स व विल्फ्रेड (बाबाशान) डिसा हे सध्या भाजपवासी झालेले आमदार त्यामुळेच निवडणूक लढविण्यासाठी त्यासाठीच वेगळा पक्ष शोधत आहेत. यासंदर्भात डिसा म्हणाले, नुवे आणि वेळ्ळी हे असे दोन मतदारसंघ आहेत जिथे मतदारांनी भाजपला कधीही थारा दिलेला नाही. पूर्वीपासून हे दोन्ही मतदारसंघ आधी युनायटेड गोवन्स व नंतर काँग्रेस धार्जिणे राहिले आहेत.

आमदार म्हणून त्यांचे आमच्याशी सलोख्याचे संबंध असले तरी आम्ही भाजप म्हणून निवडणूक लढविल्यास मतदार आम्हाला स्वीकारायला तयार असणार नाही, ही वस्तुस्थिती असल्याचे त्यांनी सांगितले. बाणावली मतदारसंघातही अशीच स्थिती आहे. मात्र नावेली, कुडतरी आणि कुंकळ्ळी या दोन मतदारसंघात हिंदू मतदारही वाढल्याने काही प्रमाणात मतदारांनी भाजप आमदारांना स्वीकारले आहे.

लोक उमेदवार बघून मतदान करतात

कुंकळ्ळीचे आमदार क्लाफास डायस या संबंधी म्हणाले, माकाझान, गिरदोली आणि चांदर या तीन पंचायतीत भाजपला थोडा विरोध असला तरी इतर ठिकाणी आमची स्थिती चांगली आहे. मी यावेळी भाजप उमेदवारीवर निवडणूक लढविणार आहे. लोक पक्षासाठी नव्हे तर उमेदवार बघून मतदान करतात. माझे ख्रिश्चन लोकांशीही चांगले संबंध असल्याने मी भाजप उमेदवार असलो तरी ख्रिश्चन मतदार मला मतदान करतील याची मला खात्री आहे, असे ते म्हणाले.

कसलीही अडचण येत नाही

सासष्टीत ख्रिश्चन मतदारांना भाजप परका असला, तरी दक्षिण गोव्यातील कुडचडे व काणकोण या हिंदुबहुल मतदारसंघांत आमदार ख्रिश्चन असल्याने भाजपला त्याचा फायदाच होणार आहे. कारण आमदार ख्रिश्चन असल्याने ख्रिस्ती मतदारही भाजपला मतदान करण्यासाठी पुढे येत असल्याचे दिसून येत आहे. माझ्या मतदारसंघात भाजप आमदार म्हणून ख्रिश्चन मतदारांना सामोरे जाण्यासाठी मला कसलीही अडचण येत नाही, अशी प्रतिक्रिया उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांनी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT