गोव्यात भाजप प्रादेशिक पक्षांबरोबर युती करण्यास तयार: सदानंद शेट तानावडे

प्रादेशिक पक्षांबरोबर युती करण्यासाठी भाजप इच्छूक असून स्थानिक पातळीवरची चर्चा आणि बोलणी करण्यासाठी गोवा भाजप (Goa BJP) तयार आहे.असे ही तानावडे यांनी म्हंटले आहे.
Sadanand Sheth Tanawade
Sadanand Sheth TanawadeDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यात (Goa) विविध पक्षांच्या वतीने राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांना आमिष देऊन पक्षांमध्ये दाखल करून घेण्याचे काम सुरू असल्याचे असल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेठ तानावडे (Sadanand Sheth Tanawade) यांनी केला आहे. याशिवाय प्रादेशिक पक्षांबरोबर युती करण्यासाठी भाजप इच्छूक असून स्थानिक पातळीवरची चर्चा आणि बोलणी करण्यासाठी गोवा भाजप (Goa BJP) तयार आहे.असे ही तानावडे यांनी म्हंटले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Union Home Minister Amit Shah) यांचा गोवा दौरा यशस्वी झाल्याचा सांगताना कार्यकर्त्यांच्या संमेलनाला अपेक्षेपेक्षा जास्त चांगला प्रतिसाद मिळाल्याचे सांगत तानावडे म्हणाले सध्या राज्यात निवडणुकीचे वारे आहे .विविध राजकीय पक्ष, राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या प्रकारची आमिष दाखवत आहेत. त्यासाठी काही एजन्सींची मदत घेण्यात येत आहे. राज्यात हा चुकीचा पायंडा पडत असून आहे. युतीबाबतचे सर्व निर्णय केंदीय पातळीवर होतील मात्र प्रादेशिक पक्षांशी बोलणी करण्यासाठी आम्ही तयार आहे. मगो पक्ष आणि गोवा फॉरवर्ड पक्षाबरोबर ही बोलणी करण्याची आमची तयारी असल्याचे यावेळी तानवडे यांनी सांगितले. यावरून युतीसाठी भाजप प्रयत्नशील असल्याचा संदेश भाजप देऊ पाहत आहे हे यावरून स्पष्ट होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Karapur One Goa Project Protest
Goa First Alliance 2027
Viresh Borkar RG Goa
Morjai Temple Property Misappropriation
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com