Sadanand Shet Tanavade takes oath as Rajyasabha MP Rajyasabha TV
गोवा

Sadanand Tanavade : तानावडेंची मराठीतून शपथ; राज्यसभेत रुजू

दैनिक गोमन्तक

Sadanand Tanavade sworn Rajya Sabha MP : भाजपचे गोवा प्रदेशाध्यक्ष तसेच नवनिर्वाचित खासदार सदानंद शेट तानावडे यांनी सोमवारी (ता.३१) दिल्लीतील राज्यसभेत सभापतींसमोर राज्यसभा सदस्यत्वाच्या पदाची व गोपनीयतेची मराठीतून शपथ घेतली.

मराठीतून राज्यसभेत शपथ घेणारे ते पहिले गोमंतकीय खासदार आहेत. गोव्यातून त्यांची राज्यसभा खासदारपदासाठी बिनविरोध निवड झाली होती. हल्लीच काही दिवसांपूर्वी माजी राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांची मुदत संपल्याने राज्यसभेतील हे पद रिक्त झाले होते.

राज्यसभेत यापूर्वी गोव्यातून निवडून गेलेल्या एकाही खासदाराने मराठीतून शपथ घेतली नव्हती. काही खासदारांनी इंग्रजी, हिंदी तसेच कोकणीतून राज्यसभेत शपथ घेतली होती. खासदार तानावडे यांनी मराठीतून शपथ घेतल्याने मराठीप्रेमींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

या शपथविधीवेळी राज्यसभेच्या दालनात माजी मुख्यमंत्री चंद्रकांत ऊर्फ बाबू कवळेकर, माजी आमदार दामू नाईक उपस्थित होते.

राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी पंचायतीपासून ते खासदार होईपर्यंत राजकारणात विविध पदे भूषविली आहेत. त्यांनी विधानसभेत थिवीचे आमदार म्हणून पाच वर्षे काम केले आहे.

त्यानंतर त्यांच्यावर भाजप प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आल्यावर त्यांनी भाजपला राज्यात सत्ता मिळवून देण्यासाठी मोलाची कामगिरी बजावली होती. त्यामुळे गोव्यातून त्यांचे एकमेव नाव भाजपच्या गाभा समितीकडून पक्षाच्या केंद्रीय समितीकडे पाठवण्यात आले होते.

कामाची पोचपावती

तानावडे यांच्या कामगिरीची दखल घेत भाजपमधील केंद्रातील ज्येष्ठ नेत्यांनी गोव्यातून राज्यसभा खासदारपदासाठी त्यांचे नाव जाहीर केले होते. राज्यसभा खासदारपदासाठीच्या निवडणुकीत गोव्यातील विरोधकांनी उमेदवारी अर्ज सादर न करण्याचा निर्णय घेतल्याने त्यांना बिनविरोध घोषित करण्यात आले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: ख्रिस्ती समाजाच्या मोर्चाचा वाहतुकीला फटका; अनेकांची गैरसोय

Saint Francis Xavier: संत फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांच्या DNA चाचणी मागणीवरून गोव्यात वाद का पेटला?

Goa Crime: लग्नाचे आमिष देवून अत्याचार करणाऱ्या ओडिशातील तरुणाचा कोर्टाने फेटाळला जामीन!

गोव्यात गेल्या दहा वर्षात सर्वाधिक 'वृक्षसंहार', शेतजमिनींचादेखील ऱ्हास; केंद्रीय अहवालातून खुलासा!

SCROLL FOR NEXT