CM Pramod Sawant, Damu Naik, Navelim BJP Dainik Gomantak
गोवा

Goa BJP: 'काँग्रेसला जे जमले नाही, ते भाजपने 10 वर्षांत करून दाखवले'! CM सावंतांचा नावेलीत पुन्हा कमळ फुलविण्याचा निर्धार

CM Pramod Sawant: भाजप सरकारने गत १० वर्षांत गोमंतकीयांसाठी विविध योजना व उपक्रम राबविले आहेत, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नावेली मतदारसंघातील कार्यकर्ता मेळाव्यात सांगितले.

Sameer Panditrao

सासष्टी: भाजप सरकारने गोव्यासाठी पुढील १०० वर्षांच्या विकासाचा विचार करून भरघोस तरतूद करून ठेवली आहे. डबल इंजिन सरकारने गोव्यात ३० हजार कोटी रुपयांच्या साधनसुविधा उभारल्या आहेत.

काँग्रेस पक्षाला त्यांच्या कार्यकाळात जे जमले नाही, ते भाजप सरकारने गत १० वर्षांत करून दाखवले आहे. गोमंतकीयांसाठी विविध योजना व उपक्रम राबविले आहेत, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नावेली मतदारसंघातील कार्यकर्ता मेळाव्यात सांगितले.

यावेळी प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर, माजी सभापती विश्र्वास सतरकर, राज्य सचिव सर्वानंद भगत, दक्षिण गोवा जिल्हा भाजप अध्यक्ष प्रभाकर गावकर, जिल्हा पंचायत सदस्य परेश नाईक, दवर्लीचे सरपंच साईश राजाध्यक्ष, मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले, की सरकारी योजना व पक्षाची ध्येय धोरणे प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचविणे हे कार्यकर्त्याचे काम आहे. आम्हाला कार्यकर्ते केवळ निवडणुकांपुरते नको आहेत. त्यांनी नियमीत मतदारांच्या संपर्कात असावे ही आमची अपेक्षा आहे. नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर यांनी आपल्या मतदारसंघातील समस्या सरकार मार्फत लवकरात लवकर सोडविल्या जातील, असे सांगितले.

स्वयंसेवी संस्थांची संख्या ५०० पर्यंत नेणार

दीनदयाळ स्वास्थ्य योजनेंतर्गत सरकार वर्षाकाठी ७० कोटी रुपये खर्च करीत आहे. मनुष्यबळ विकास संसाधन महामंडळ स्थापन करून पुढील दोन वर्षांत ४ हजार नोकऱ्या जाहीर केल्या जातील. तसेच सध्या गोव्यात ३४२ स्वयंसेवी संस्था असून त्यात ४८ हजार महिला काम करीत आहेत. पुढील वर्षी स्वयंसेवी संस्थांची संख्या ५०० पर्यंत नेण्याचे व एक लाख महिलांना रोजगार देण्याचे आमचे लक्ष्य असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT