Savio Rodrigues Dainik Gomantak
गोवा

Savio Rodrigues यांचा भाजपला घरचा आहेर; कला अकादमी निविदा प्रक्रियेची चौकशीची मागणी

कला अकादमी नूतनीकरण कामासाठी 56 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

निविदा प्रक्रिया न राबवल्याने कला अकादमी नूतनीकरण काम सुरूवातीपासून वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या प्रकरणाची चौकशी केली जावी अशी समस्त गोमंतकीयांकडून मागणी होत आहे. त्यातच आता गोवा भाजपचे प्रवक्ते सॅवियो रॉड्रिग्ज यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना पत्र लिहले आहे. रॉड्रिग्ज यांनी कला अकादमी निविदा प्रक्रियेची चौकशी करून दोषी असणाऱ्या मंत्र्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

कला अकादमी नूतनीकरण कामासाठी 56 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात देखील हा मुद्दा प्रचंड गाजला होता. दरम्यान, आता गोवा भाजपचे प्रवक्ते सॅवियो रॉड्रिग्ज यांनी भाजपला घरचा आहेर देत या कामाची चौकशीची मागणी केली आहे. 'निविदा प्रक्रिया विरोधात प्रश्न उपस्थित करून सरकार व मंत्री यांच्यावर नाराजी व्यक्त करने हा माझा हेतू नाही. पण, निविदा प्रक्रियेला डावलून नामनिर्देशन प्रक्रिया का निवडली याचे कारण जाणून घेणे हा माझा उद्देश आहे.' असे रॉड्रिग्ज यांनी पत्रात म्हटले आहे.

रॉड्रिग्ज यांनी पत्रात पक्षाच्या उद्देशाची मुख्यमंत्र्यांना आठवण करून दिली आहे. आपल्या पक्षाचे तत्त्व राष्ट्र प्रथम असे असून, पक्ष द्वितीय आणि स्व सर्वात शेवटी येतो. माझा या तत्त्वावर विश्वास आहे. याच तत्त्वामुळे गोवा सरकारने निविदा प्रक्रिया न राबवता खासगी एजन्सीला दिलेल्या कामाचा मुद्दा मी उपस्थित करत आहे. सरकराने नियमांना डावलत खासगी एजन्सीला दिलेल्या कामामुळे सरकारमध्ये भ्रष्टाचाराची शक्यता आणि संभाव्यता निर्माण होते. असे रॉड्रिग्ज यांनी म्हटले आहे.

मंत्री गोविंद गावडे यांच्या देखील विधानाचा रॉड्रिग्ज यांनी पत्रात समाचार घेतला आहे. भारत हे लोकशाही प्रधान राष्ट्र आहे. त्यामुळे गोव्याची तुलना शाहजहानच्या कालखंडाशी करणे म्हणजे सरकार ‘शासक’ आणि नागरिक ‘प्रजा’ आहे. असे लोकांना सांगितल्या सारखे आहे. आपल्या लोकशाहीत राजकीय नेते ‘जनतेचे सेवक’ असतात. याची आठवण रॉड्रिग्ज यांनी पत्रात करून दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

SCROLL FOR NEXT