Land Grabbing Case: अखेर मामलेदार राहूल देसाई सेवेतून निलंबित; SIT कडून अटक

बार्देश तालुक्यातील जमीन हडप प्रकरण भोवले
Land Grabbing Case
Land Grabbing CaseDainik Gomantak
Published on
Updated on

Land Grabbing Case: बार्देश तालुक्यातील जमीन हडप प्रकरणातील मास्टरमाईंड आणि तत्कालीन बार्देशचा मामलेदार राहूल देसाई याला अखेर सेवेतून निलंबित केले आहे. देसाई विरोधात यापूर्वीच एसआयटीने गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, त्याला आज अटक केली आहे.

(Mamlatdar rahul desai suspended from service in illegal land grabbing case)

Land Grabbing Case
Mormugao: 'तो' कम्युनिटी हॉल प्रकल्प म्हणजे 'पांढऱ्या हत्ती'चे उत्तम उदाहरण

बनावट दस्तावेज तयार करून जमीन हडप करण्याच्या प्रकरणात सुरू असलेल्या चौकशी दरम्यान एसआयटीने देसाईला ताब्यात घेत चौकशी सुरु केली होती. गोव्यात प्रथमच एका राजपत्रित अधिकाऱ्याला अटक करण्यात आल्याची ही घटना आहे. मिळालेल्या माहितीनुसार दक्षता खात्याकडून (Vigilance Department) आज निलंबनाचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

Land Grabbing Case
Water Supply: बार्देश, डिचोली तालुक्यात तीन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

बार्देश तालुक्यातील जमिन घोटाळ्यातील 20 पेक्षा जास्त तक्रारी नोंद

मुरगाव तालुक्यातील 2 व 3 संयुक्त मामलेदार राहुल देसाई यांच्यावर बार्देश तालुक्यातील जमीन बळकवल्याच्या आरोपाखाली विशेष तपास यंत्रणेने यापूर्वीच जबाब नोंदविण्यात आला आहे. संयुक्त मामलेदार देसाई यांच्यावर बार्देश तालुक्यातील जमिन घोटाळ्यातील 20 पेक्षा जास्त तक्रारी म्हापसा पोलिसात नोंद झाल्या आहेत. नंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जमिन घोटाळ्याचे तपासकार्य पणजी येथील विशेष तपास यंत्रणेकडे सुपूर्द केले होते.

...आज निलंबित होण्याची वेळ आली

एसआएटी तर्फे जमिन घोटाळा प्रकरणी तपास करण्यास सुरुवात करताच प्रथमदर्शनी बार्देश तालुक्यातील संयुक्त मामलेदार राहुल देसाई व इतर पाचजण संशयाच्या भोवऱ्यात सापडले. या प्रकरणात एसआयटीला आणखीन ठोस पुरावे मिळताच त्याच्या तपास कार्याला गती मिळाली. यामूळेच मामलेदार याच्यावर आज निलंबित होण्याची वेळ आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com