Bike Burnt in Candolim Dainik Gomantak
गोवा

कांदोळीत जळीतकांड, अज्ञाताने दुचाकीच पेटवल्या

लाईफगार्ड्सच्या दुचाकींनी अज्ञात व्यक्तीकडून आग, दुचाकी जळून खाक

दैनिक गोमन्तक

पणजी : किनाऱ्यावर लोकांच्या जीवाचं रक्षण करणाऱ्या लाईफगार्ड्सच्या दुचाकी अज्ञाताने जाळल्या आहेत. बुधवारी सकाळी ही घटना घडल्याची माहिती आहे. कांदोळी किनाऱ्यावर लाईफगार्डच्या दुचाकींना अज्ञाताने आग लावल्याने एकच खळबळ उडाली आहे.

कांदोळीत बामनवाडो परिसरात असलेल्या व्हिस्परिंग पाम्स येथे लाईफगार्ड्सच्या दुचाकी जाळण्यात आल्या आहेत. अज्ञाताने हे कृत्य केलं असून बुधवारी सकाळी हे जळीतकांड घडलं आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन दुचाकींमधील पेट्रोल काढूनच इतर सर्व दुचाकी पेटवण्यात आल्या आहेत. लाईफगार्ड्सना राहण्यासाठी दिलेल्या फ्लॅटखालीच या दुचाकी पेटवण्यात आल्या आहेत.

दरम्यान या आग लावण्यामागचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. वैयक्तिक वादातून माथेफिरुने या दुचाकी पेटवल्याचा संशय व्यक्त केला जात असून पोलिसात याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन चौकशी सुरु केली आहे. अज्ञात आग लावणाऱ्या व्यक्तीचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT