Bihar CM Nitishkumar on Goa CM Pramod Sawant
Bihar CM Nitishkumar on Goa CM Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

Nitishkumar on Goa CM: नितीशकुमार यांचे गोव्याच्या मुख्यमंत्र्यांवर ताशेरे; दिला 'हा' सल्ला...

Akshay Nirmale

एक मे रोजी बिहारी कामगारांबाबत केलेल्या वक्तव्याने गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत अडचणीत आले आहेत. बिहारी नेत्यांकडून त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यानंतर आता बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनीही प्रमोद सावंत यांच्यावर टीका केली आहे.

(Bihar CM Nitishkumar on Goa CM Pramod Sawant)

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांवर ताशेरे ओढत प्रमोद सावंत यांनी बिहारींबद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्याचा निषेध केला आहे. नितीशकुमार म्हणाले की, बिहारींबाबत असे वक्तव्य कधीही करू नये. लोकांनी अशी वक्तव्ये टाळावीत.

यापुर्वी तेजस्वी यादव यांच्यासह मनिष सिंह आणि बिहारमधील बहुतांश प्रादेशिक पक्षाच्या नेत्यांनी प्रमोद सावंत यांच्यावर टीका केली होती. प्रमोद सावंत यांनी गोव्यातील 90 टक्के गुन्ह्यांना बिहारी आणि युपीचे मजूर कारणीभूत असतात, असे वक्तव्य केले होते. त्यावरून बिहारमध्ये त्यांच्याविरोधात असंतोष वाढला आहे.

दरम्यान, बिहारमध्ये जात जनगणना थांबवण्यासाठी पाटणा उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. जात जनगणनेवर बंदी घालण्यात आली आहे. त्यावरून तिथे गदारोळ सुरू झाला आहे.

जातीय जनगणनेविषयी नितीश कुमार म्हणाले की, जात जनगणना ही कोणा एका व्यक्तीची नाही. कोणा एका व्यक्तीच्या संमतीने नाही तर संपूर्ण सभागृहाच्या संमतीने अशी जनगणना केली जात आहे. सर्वांनी मिळून जात जनगणना करण्याचे मान्य केले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Fatal Accident: अपघातानंतर दोघेही अर्धातास वाहनात अडकून पडले, एकाचा मृत्यू एक गंभीर जखमी

OCI Issue : ओसीआय प्रकरणी फसवणूक नाही! मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत

Goa Today's Live News: विकट भगत विरोधात पुन्हा गुन्हा नोंद

Goa Crime News: भागीदारीच्या नावाखाली 35 लाखांचा गंडा तर, पर्वरीत पर्यटकांच्या खोलीत 3 लाखांची चोरी

Goa News : समान नागरी कायदाप्रश्‍नी मोदींकडून गोव्याचे कौतुक

SCROLL FOR NEXT