Goa Traffic: सावधान! वाहतूक नियमांचे उल्लंघन नकोच; गोव्यात 'या' तारखेपासून थेट घरी येणार चलन

वाहतूक संचलनालयातर्फे ITMS प्रणालीची अंमलबजावणी
Goa Traffic
Goa TrafficDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Traffic ITMS system: गोव्यात आता वाहतुकीच्या नियमांची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यासाठी ITMS प्रणालीचा वापर केला जाणार आहे. ITMS प्रणालीवर नोंदवलेल्या वाहतूक गुन्ह्यांवरून थेट ऑनलाईन चलन धाडले जाईल. 22 मे च्या मध्यरात्रीपासून याची अंमलबजावणी केली जाईल, असे परिवहन संचलनालयाने कळवले आहे. मोटर वाहन कायदा 1988 च्या सेक्शन 136-A अंतर्गत ही कारवाई केली जाणार आहे.

(Goa Directorate of Transport)

Goa Traffic
Bilawal Bhutto India Visit: बिलावल यांचं आजोळ आणि गोव्याचं खास कनेक्शन तुम्हाला माहितीये? पाकिस्तानमध्ये आहे गोमंतकीयांची वस्ती...

ITMS प्रणालीवर वाहनधारकांनी केलेल्या गुन्ह्याची नोंद होणार आहे. पणजी शहरातील दिवजा सर्कल, कस्टम हाऊस जंक्शन, फेरी व्हार्फ जंक्शन, कला अकादमी जंक्शन, सायन्स सेंटर मिरामार, सेंट मायकल स्कूल ताळगाव रोड तिसवाडी, गोवा विद्यापीठ-दोना पावला रोड, मेरशी जंक्शन आणि बार्देश तालुक्यातील चार ठिकाणी ही प्रणाली कार्यान्वित होणार आहे.

दरम्यान, गोव्यात मर्सेस जंक्शन येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) वर चालणारी वाहतूक व्यवस्थापन प्रणाली सुरू केली आहे. ही प्रणाली राज्य प्राधिकरणांना सुरक्षा, सिग्नल व्यवस्थापन आणि दंड आणि तिकिटे (चलन) जारी करण्यात मदत करेल. हे तंत्रज्ञान स्वतःहुनच आपोआप वाहतुकीचे उल्लंघन शोधते आणि उल्लंघनकर्त्याच्या पत्त्यावर ई-चलन पाठवते.

या एआय प्रणालीमुळे मानवी चुका कमी होतील, भ्रष्टाचार कमी होईल. वाहतुकीच्या नियमांचे कोणी उल्लंघन केल्यास त्याची रिअल टाईम छायाचित्रे उपलब्ध होतील.

Goa Traffic
Goa HSSC Result 2023 : निकालाचं काऊंटडाऊन सुरु; 12वीच्या परीक्षेचा निकाल 6 मे रोजी जाहीर होणार

AI आणि मशीन लर्निंग (ML) तंत्रज्ञानाचा वापर ITMS मध्ये स्वयंचलितपणे वाहतूक उल्लंघन ओळखण्यासाठी केला जातो. शहरातील 30 ट्रॅफिक जंक्शनवर ITMS बसवले आहेत.

कॅमेरे वेगमर्यादेचे उल्लंघन आणि लाल दिवा आणि लेनचे उल्लंघन थांबवू शकतात, हेल्मेटशिवाय प्रवास, सीटबेल्ट न लावता वाहन चालवणे, ट्रिपल राइडिंग आणि वाहन चालवताना मोबाइल फोन वापरणे यासारखे गुन्हे शोधू शकतात.

नंबर प्लेट रेकग्निशन कॅमेरे आणि 50 जंक्शनवर 80 रेड लाइट व्हायलेशन डिटेक्शन कॅमेरे बसवले आहेत. चोवीस तास कार्यरत असलेल्या या कॅमेऱ्यांतून संकलित केलेला डेटा वाहतूक पोलिसांकडील सर्व्हरवर साठवला जातो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com