Bicholim Coocking On Road Dainik Gomantak
गोवा

Bicholim: भर रस्त्यावर पेटवली चूल! उत्तरप्रदेशमधून आलेल्या कुटुंबाचा प्रकार; डिचोली पालिकेकडून कारवाई

Bicholim Coocking On Road: भर रस्त्यावर चूल पेटवून अन्नपदार्थ शिजवणाऱ्या परप्रांतीय कुटुंबाआड डिचोली पालिकेने कारवाई करताना त्यांना हुसकावून लावले.

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली: भर रस्त्यावर चूल पेटवून अन्नपदार्थ शिजवणाऱ्या परप्रांतीय कुटुंबाआड डिचोली पालिकेने कारवाई करताना त्यांना हुसकावून लावले. हा प्रकार (शुक्रवारी) सकाळी शहरातील ‘सेतू संगम’ प्रकल्पस्थळी घडला.

यासंबंधीची माहिती अशी की, शहरातील ''सेतू संगम'' प्रकल्पाच्या प्रवेशद्वारा समोरील जंक्शनवर चूल पेटवून एक महिला चपात्या भाजत होती. या महिलेसोबत दोन पुरुष आणि तीन लहान मुले होती. कोणाचीही पर्वा न करता या कुटुंबाकडून घरात स्वयंपाक करत असल्याच्या थाटात साधारण तासभर हा प्रकार चालू होता.

भर रस्त्यावर हा प्रकार चालू असल्याने तेथून ये-जा करणाऱ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. अनेकांनी या प्रकाराबाबत आश्चर्यही व्यक्त केले. डिचोली पालिकेला या प्रकाराची माहिती मिळताच पालिकेच्या पर्यवेक्षकांनी त्याठिकाणी येऊन त्यांना समज देत तेथून हुसकावून लावले. पालिकेच्या या कारवाईनंतर या कुटुंबाने तेथून गाशा गुंडाळला.

मिळालेल्या माहितीनुसार, भर रस्त्यावर अन्न शिजविणारे संबंधित कुटुंब हे उत्तरप्रदेशमधील असून मजुरीनिमित्त ते आजच गोव्यात आले आहे. पर्यटक किंवा कामगारवर्गाकडून शहरात रस्त्यावर वा उघड्यावर अन्नपदार्थ शिजवण्याचे प्रकार घडल्यास ते खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा नगराध्यक्ष विजयकुमार नाटेकर यांनी दिला आहे.

कडक कारवाई हवी!

राज्यात अनेक ठिकाणी अशा प्रकारे उघड्यावर मजूर लोक जेवण तयार करतात. हा प्रकार धोकादायक असून जवळच्या मालमत्तेला आग लागण्याची शक्यता असते. काही ठिकाणी पर्यटकही रस्त्यांच्या बाजूला वाहन उभे करून जेवण तयार करतात, त्याच ठिकाणी इतर विधीही करतात. असे प्रकार थांबविण्यासाठी पंचायत, नगरपालिका पातळीवर कडक कारवाई होणे आवश्‍यक आहे, असे मत ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मस्करीची झाली कुस्करी! बॉसला एका शब्दासाठी मोजावे लागले 29 लाख, महिला कर्मचाऱ्याला चिडवणं पडलं महागात; काय नेमकं प्रकरण?

Goa Drugs Case: अंमली पदार्थांविरोधात फातोर्डा पोलिसांचा 'ॲक्शन मोड'! 'इतक्या' हजारांच्या गांजा जप्त; 25 वर्षीय तरुणाच्या आवळल्या मुसक्या

US Visa Fraud Case: कॅमेऱ्यासमोर शस्त्राचा धाक, पण सगळं 'फेक'! ग्रीन कार्डसाठी 'डेंजर' जुगाड; अमेरिकन पोलिसांकडून 11 भारतीयांना बेडया

Alphonso Alert: हापूसवर युद्धाचं सावट! मध्यपूर्वेतील संघर्षाचा कोकणच्या आंब्याला फटका; निर्यातीचं गणित बिघडणार

Girdoli: 10 दिवस पाणीपुरवठा ठप्प, विहिरीचे पाणी आटले; संतप्त ग्रामस्थांचा अभियंत्याला घेराव

SCROLL FOR NEXT