Bicholim Municipal Council Meeting Dainik Gomantak
गोवा

Bicholim Municipal Council: डिचोली करणार ‘प्लास्टिकमुक्त’! पालिका-स्वच्छतादूतांच्या बैठकीत निर्धार

Bicholim News: प्लास्टिक वापरणारे विक्रेते आणि ग्राहकांविरोधात कडक दंडात्मक कारवाई करण्याचे संकेत

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली शहर कचरा आणि प्लास्टिकमुक्त करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याचा संकल्प डिचोली नगरपालिकेने केला आहे. प्लास्टिक वापरणारे विक्रेते आणि ग्राहकांविरोधात कडक दंडात्मक कारवाई करण्याचे संकेतही पालिकेने दिले आहेत. लवकरच शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.

पालिका क्षेत्रातील कचरा समस्येसंदर्भात आढावा घेण्यासाठी पालिका मंडळ आणि स्वच्छतादूत यांची एक संयुक्त बैठक पालिका सभागृहात झाली. नगराध्यक्ष कुंदन फळारी यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्याधिकारी सचिन देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडली.

या बैठकीला उपनगराध्यक्ष दीपा पळ, विजयकुमार नाटेकर, ॲड. रंजना वायंगणकर, ॲड. अपर्णा फोगेरी, रियाझ बेग आदी नगरसेवकांसह शहरात स्वच्छता करणारे स्वच्छतादूत उपस्थित होते.

‘स्वच्छ शहर’ अशी ओळख असलेल्या डिचोलीतील काही भाग कचऱ्यासाठी ‘हॉट स्पॉट’ ठरले आहेत. स्वच्छता मोहीम राबवूनही काही भागात कचरा टाकण्याचे प्रकार सुरूच आहेत. बाजारात प्लास्टिक पिशव्यांचा वापरही सर्रासपणे होतोय, अशी खंत स्वच्छतादूतांनी व्यक्त करून कचरा आणि प्लास्टिकमुक्तीसाठी कडक पावले उचलावीत, अशी मागणी केली.

संध्या खानोलकर, सूर्यकांत देसाई, भारतेश गुळणवार, देवानंद गोळम, रामचंद्र पळ, कॅजिटन वाझ आदी स्वच्छतादूतांनी बैठकीत सहभाग घेतला. कचरा, प्लास्टिक समस्या नियंत्रणात आणण्यासाठी काय करता येईल, याविषयी स्वच्छतादूतांनी सूचना केल्या. विजयकुमार नाटेकर यांनीहीमार्गदर्शन केले.

लवकरच सीसीटीव्‍ही कॅमेरे बसविणार

प्लास्टिकमुक्ती आणि त्‍याबाबतच्‍या जागृतीसाठी सर्वांनी सहकार्य करणे काळाची गरज आहे. पालिका क्षेत्रात नियमितपणे कचऱ्याची उचल होत आहे. तरीसुद्धा कचरा उचलण्यात हयगय होत असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी ताबडतोब पंचायतीशी संपर्क साधावा. कचऱ्याचे हॉटस्पॉट आहेत, तेथे लवकरच सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येतील, असे मुख्याधिकारी सचिन देसाई यांनी सांगितले.

सचिन देसाई, मुख्याधिकारी (डिचोली)

प्लास्टिकच्‍या पिशव्‍यांचा वापर करणाऱ्यांवर पालिकेतर्फे वेळोवेळी दंडात्मक कारवाई करण्यात येते. मात्र मार्केट निरीक्षकांची कमतरता असल्याने नियमित कारवाई करणे अवघड बनते. यापुढे ही कारवाई कडक करण्यात येईल. दंडाची रक्कमही वाढविण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT