Bicholim Road Potholes: भयानक अपघात घडण्यापूर्वी उपाययोजना करा; वाहनचालकांची मागणी

North Goa's Bicholim Sanquelim Road: डिचोली-साखळी रस्त्यावर धोकादायक ‘खड्डा’
Bicholim Road: भयानक अपघात घडण्यापूर्वी उपाययोजना करा; वाहनचालकांची मागणी
Bicholim Sanquelim Road's PotholeDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली-साखळी रस्त्यावरील गोकुळवाडा-सर्वण येथे मुख्य रस्त्यावर पडलेला ''खड्डा'' रुंदावत चालला असून, हा धोकादायक खड्डा त्वरित बुजवावा, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे. गोकुळवाडा येथे रंब्लर्सला टेकून पडलेला हा खड्डा वाहतुकीस अत्यंत असुरक्षित बनला आहे.

डिचोली-साखळी रस्त्यावरील गोकुळवाडा-सर्वण येथे मुख्य रस्त्यावर साखळीच्या दिशेने जाताना डाव्याबाजूला खड्डा पडला आहे. हा खड्डा रुंदावत असून, अपघातांना आमंत्रण ठरत आहे. डिचोलीहून साखळीच्या दिशेने जाताना आणि डिचोलीच्या दिशेने येताना या खड्डयाचा सहजासहजी अंदाज येत नाही.

रंब्लर्सला टेकून वाहनचालकासमोर या खड्डयाचे संकट उभे राहते. बऱ्याचदा या खड्डयात गचके बसून दुचाकी कलंडण्याच्या घटना घडत असतात. या खड्डयामुळे आज (मंगळवारी) दुपारी एक दुचाकीस्वार जखमी झाला. अशी माहिती काही स्थानिकांकडून मिळाली आहे.

Bicholim Road: भयानक अपघात घडण्यापूर्वी उपाययोजना करा; वाहनचालकांची मागणी
Bicholim News: भरपावसात डिचोली शहरात अनेक समस्या

रात्रीच्या वेळी तसेच पावसावेळी तर या खड्डयाचा अंदाजच येत नाही. त्यावेळी वाहनचालकांचा गोंधळ उडतो. डिचोली-साखळी रस्त्यावरून दरदिवशी हजारो वाहनाची ये-जा चालू असते. मात्र सर्वण येथील या धोकादायक खड्डयामुळे एखादेवेळी भयानक अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. संबंधितांनी संभाव्य धोका ओळखून खड्डा मोठा होण्यापूर्वीच हा खड्डा बुजवावा, अशी वाहनचालकांची आग्रही मागणी आहे.

साबांखाने सतर्क व्हावे

जोरदार पावसामुळे छोटे खड्डे मोठे होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे तालुक्यातील काही रस्त्यांवर असलेले छोटे खड्डे त्वरित बुजविण्याची गरज आहे. काही ठिकाणी रस्ता उखडत चालला आहे. तसेच गटारे भरल्यानेही काही ठिकाणी पाणी रस्त्यावर येत आहे. त्यामुळेही शहराबरोबरच ग्रामीण भागातील रस्त्यावरून वाहने चालविणे कठीण होत आहे. संबंधितांनी या प्रकाराकडे लक्ष द्यावे,अशी नागरिकांची मागणी आहे. सार्वजनिक बांधकाम खात्यानेही सतर्क राहाण्याची गरज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com