Kudne Aakh Sheti Dainik Gomantak
गोवा

Bicholim: कुडणेतील 'आख' शेती 13 वर्षांपासून पडीक, शेतकरी संकटात; पुनर्जीवित करण्यासाठी CM सावंतांनी लक्ष घालण्याची मागणी

Kudne Aakh Sheti: कुडणे येथील ‘आख’ ही शेती गेल्या जवळपास १३ वर्षांपासून पडीक पडली असून, ही शेती पुनर्जीवीत करण्यासाठी सरकारी वा अन्य पातळीवर प्रयत्न वा आवश्यक हालचाली होत नाहीत.

Sameer Amunekar

डिचोली: कुडणे येथील ‘आख’ ही शेती गेल्या जवळपास १३ वर्षांपासून पडीक पडली असून, ही शेती पुनर्जीवीत करण्यासाठी सरकारी वा अन्य पातळीवर प्रयत्न वा आवश्यक हालचाली होत नाहीत. त्यामुळे कृषी संस्कृती असलेले कुडणे येथील शेतकरी अस्वस्थ बनले असून, त्यांच्यात नाराजी व्यक्त होत आहे. या भागाचे आमदार तथा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याप्रश्नी गांभीर्याने लक्ष घालून ‘आख’ शेतीला गतवैभव मिळवून द्यावे. अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

खाऱ्या पाण्याचा प्रादुर्भाव आणि गाळ साचल्याने कुडणे येथील ''आख'' ही जवळपास १६० एकर शेती पडीक पडली आहे. सध्या या शेतीत मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून, पूर्ण शेती गवत आणि झुडपांनी वेढली आहे. त्यामुळे गावातील ५० हून अधिक शेतकरी संकटात आले आहेत.

शेती पुन्हा फुलवून गावात ‘हरितक्रांती’ घडवितानाच शेतकऱ्यांनी ‘आत्मनिर्भर’ व्हावे, असे आवाहन सरकारतर्फे करण्यात येत आहे. त्यासाठी कुडणेतील शेतकरी इच्छुक आहेत.

मात्र त्यासाठी ‘आख’ शेती पुनर्जिवीत करण्यासाठी सरकारी पातळीवरून सहकार्याची आवश्यकता आहे. सरकारने उपाययोजना करावी, याबाबचे निवेदन बाराजण मानस आख शेती संघटनेतर्फे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना दिले आहे.

मानस दुरुस्ती आवश्यक

‘आख’ शेतीजवळ ‘बाराजण’ मानस आहे. या मानशीची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांतर्फे करण्यात येत आहे. यापूर्वी दुरुस्ती व्यवस्थित झालेली नाही. त्यामुळे भरतीच्यावेळी खारे पाणी शेतीत घुसत आहे.

पूर्वी खारे पाणी तेथीलच ‘कोळंब’ तळ्यात साचून राहत असे. त्यामुळे खाऱ्या पाण्याचा मोठासा प्रादुर्भाव शेतीवर होत नव्हता. मात्र कालांतराने ''कोळम'' तळ्यात गाळ साचल्याने खारे पाणी शेतीत घुसू लागले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT