Pravin Arlekar And Babu Ajgaonkar Controversy
Pravin Arlekar And Babu Ajgaonkar ControversyDainik Gomantak

Goa Politics: पक्षशिस्त मोडल्यास 'डायरेक्ट अ‍ॅक्शन', दामू नाईकांचा आर्लेकर-आजगावकर यांना इशारा; म्हणाले, "सांगणार नाही, थेट कारवाईच करणार"

Pravin Arlekar And Babu Ajgaonkar Controversy: पक्षशिस्तीबाबत एकदाच सांगणार, पुन्‍हा-पुन्‍हा सांगणार नाही तर थेट कारवाईच करणार’’, असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी दिला.
Published on

पणजी : ‘‘पक्षात राहायचे असेल तर पक्षशिस्त ही पाळावीच लागेल. पक्षशिस्तीबाबत एकदाच सांगणार, पुन्‍हा-पुन्‍हा सांगणार नाही तर थेट कारवाईच करणार’’, असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी दिला. पेडण्‍याचे आजी-माजी आमदार अनुक्रमे प्रवीण आर्लेकर व बाबू आजगावकर यांच्‍यातील वादाच्‍या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.

बाबू आजगावकर व प्रवीण आर्लेकर यांनी गांजा विक्रीवरून एकमेकांवर चिखलफेक केली होती. त्याची दखल भाजपने घेतली आहे. प्रदेशाध्‍यक्ष दामू नाईक यांनी ‘गोमन्तक’ला सांगितले की, पक्षात राहायचे असल्यास पक्षशिस्त पाळावीच लागेल.

ती पाळायची नसेल तर दरवाजे उघडे आहेत असे सरळ धोरण आहे. पक्षासमोर कोणीही मोठा नाही. त्यामुळे योग्य शब्दांत या दोन्ही नेत्यांना समज दिलेली आहे.

Pravin Arlekar And Babu Ajgaonkar Controversy
Goa Politics: 'गांजा'वरुन आरोप करणाऱ्या विद्यमान आणि माजी आमदारांची चौकशी करा; 'आप' नेते पालेकरांची मागणी

आजगावकर व आर्लेकर यांच्‍या विधानांमुळे विरोधकांना आयतेच कोलीत मिळाले आहे. पक्षाच्‍या प्रतिमेलाही तडा गेला आहे. यापूर्वीही या दोघांत शाब्दिक युद्ध रंगत होते.

त्यावेळी समज देऊन प्रकरण मिटवण्यात येत असे. आता त्यांना केवळ एकवेळ समज दिली जाईल. आज ती दिली गेली आहे. यापुढेही त्‍यांचे वागणे तसेच राहिले तर पक्ष त्यांच्यावर कारवाई करण्यास मागेपुढे पाहणार नाही, असे दामू नाईक यांनी सांगितले.

Pravin Arlekar And Babu Ajgaonkar Controversy
Goa Crime: कुडचडे बलात्कार प्रकरण: जीम ट्रेनर सरवर खानला अटकपूर्व जामीन! अटक केल्‍यास 50 हजारांच्‍या जामिनावर सोडण्‍याचा आदेश

विधानसभा निवडणुकीला अद्याप दीड वर्ष आहे. पेडण्यातून भाजपच्या उमेदवारीवर कोण लढणार, हे ठरवायला अद्याप वेळ आहे. त्यामुळे भाजपच्या दोन नेत्यांनी तेथील राजकारणावरून एकमेकांवर चिखलफेक करणे योग्य नाही. त्यांना एकदा समज दिलेली आहे, पुन्‍हा देणार नाही. - दामू नाईक, भाजप प्रदेशाध्‍यक्ष

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com