Goa Crime: 'सोनसाखळी चोर' इराणी गँग गोव्यात पुन्हा सक्रिय! मायणा-कुडतरी चोरी प्रकरणातील एकाला पुण्यातून अटक

Gold Chain Snatching Case: एकट्या-दुकट्या महिलांना हेरून त्यांच्या सोनसाखळ्या हिसकावून नेणारी पुण्यातील ‘इराणी गँग’ पुन्हा एकदा दक्षिण गोव्यात सक्रिय झाली आहे.
Gold Chain Snatching Case
Gold Chain Snatching CaseDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: एकट्या-दुकट्या महिलांना हेरून त्यांच्या सोनसाखळ्या हिसकावून नेणारी पुण्यातील ‘इराणी गँग’ पुन्हा एकदा दक्षिण गोव्यात सक्रिय झाली असून, मायणा-कुडतरी पोलिसांनी आपल्या हद्दीत घडलेल्या एका चोरी प्रकरणात पुणे येथून याच गँगमधील एकाच्या मुसक्या आवळल्या. रहीम मिर्झा असे या संशयिताचे नाव असून, त्याला अटक करून पुढील चौकशीसाठी पाच दिवसांची पोलिस कोठडी घेतली आहे.

मायणा-कुडतरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरुण गावस देसाई पुढील तपास करीत आहेत. राय येथे बसथांब्यावर बसच्या प्रतीक्षेत उभ्या असलेल्या सुषमा शिरोडकर या महिलेची सोनसाखळी बुलेटवरून आलेल्या एका युवकाने हिसकावून पळ काढला होता.

Gold Chain Snatching Case
Goa: राज्यातील नद्यांची पातळी वाढली, सत्तरी तालुक्‍याला पुराची भीती; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना यात ‘इराणी गँग’ गुंतली असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी एक पथक पुणे येथे पाठवून दिले होते. या पथकाने रहीम याला पकडले.

दक्षिणेत उपद्रव

सोनसाखळी हिसकावून नेण्याच्या घटना घडत असतात. २०२४ साली येथे अशाप्रकारच्या ८ तर २०२३ साली १० घटना घडल्या होत्या. घटना वाढत असतानाही चोरटे पोलिसांच्या हाती लागत नसल्याने लोकही भयभीत झाले होते.

Gold Chain Snatching Case
Goa Pune Flight: हवेतील थरार! गोवा - पुणे विमानाच्या खिडकीची फ्रेम निखळली; धक्कादायक Video Viral

पोलिसांनी आता ‘इराणी गँग’च्या एकाला अटक केल्याने, यापूर्वी घडलेल्या अशा प्रकारच्या चोऱ्यांचा छडा लागेल, अशी आशा नागरिक बाळगून आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com