Goa CM Pramod Sawant Vs MLA Vijai Sardesai  Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: 'भाऊसाहेब बांदोडकरांना गोव्याच्या अस्मितेची अ‍ॅलर्जी होती', विजय सरदेसाईंचे वक्तव्य; CM सावंतांनी घेतला खरपूस समाचार

Goa CM Vs Vijai Sardesai : बांदोडकर गोव्याच्या अस्मितेबाबत जो काही विचार करत होते त्यामुळे जनमत कौल घ्यावा लागला, असे सरदेसाई म्हणाले.

Pramod Yadav

पणजी: गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दिवगंत भाऊसाहेब बांदोडकरांना गोव्याच्या अस्मितेची अ‍ॅलर्जी होती. तशीच अ‍ॅलर्जी सध्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना देखील आहे, असे वक्तव्य फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाईंनी केले. सरदेसाईंच्या या वक्तव्यांचा मुख्यमंत्री सावंतांनी खरपूस समाचार घेतलाय. खरी समस्या सरदेसाईंचा अंहकार असल्याचे म्हणत सावंतांनी आमदारांच्या वक्तव्याचा निषेध केला.

अस्मिता दिवस राज्य पातळीवर साजरा करण्यात आला नाही म्हणून विजय सरदेसाईंनी माजी मुख्यमंत्री बांदोडकर आणि विद्यमान मुख्यमंत्री सावंत यांच्यावर टीका केली.

"भाऊसाहेब बांदोडकर गोव्याचे पहिले मुख्यमंत्री त्यांनी काही चांगल्या गोष्टी देखील केल्या. पण, एक चूक केली ती म्हणजे गोव्याच्या अस्मितेबाबत. बांदोडकर गोव्याच्या अस्मितेबाबत जो काही विचार करत होते त्यामुळे जनमत कौल घ्यावा लागला. आणि कित्येक वर्षानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत देखील तोच विचार करतात."

"मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना गोव्याच्या अम्मितेची अ‍ॅलर्जी आहे. विधानसभेत आश्वासन देऊन देखील त्यांनी यावर्षी राज्यपातळीवर अस्मिता दिवस साजरा केला नाही. या अर्थ काय तर गोव्याच्या अस्मितेचा विषय येतो तेव्हा मुख्यमंत्री सावंत झोपतात. गोव्याचे पहिले मुख्यमंत्री बांदोडकरांना देखील गोव्याची अस्मितेचा अ‍ॅलर्जी होती त्यामुळे त्यांनी जनमत कौल घ्यायला लावला", असे आमदार सरदेसाई म्हणाले.

विजय सेरदेसाई यांच्या या वक्तव्याचा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी निषेध करत सरदेसाईंच्या अहंकारावर बोट ठेवले.

"भाऊसाहेब बांदोडकरांना गोव्याच्या अस्मिताताईंची ॲलर्जी कधीच नव्हती! भाऊसाहेबांनी चूक केली किंवा गोव्याच्या अस्मितेची ॲलर्जी असल्याचा दावा करणे म्हणजे केवळ खोटेपणा नव्हे तर पहिल्या मुख्यमंत्र्यांच्या वारशाचा अपमान आहे."

"भाऊसाहेब हे एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी गोव्याची ओळख टीकवण्यासाठी प्रयत्न केला. खरी समस्या विजय सरदेसाई आणि त्यांच्या फुगलेल्या अहंकाराची आहे. इतरांपेक्षा तेच अधिक गोमंतकीय आहेत असं त्यांना वाटंत."

"या भाऊसाहेब विरोधी आणि गोवा विरोधी वक्तृत्वाचा मी निषेध करतो. अशी टिप्पणी म्हणजे गोव्याच्या आत्म्याचा अनादर आहे", असे सावंत म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT