Porvorim: ‘त्या’ वटवृक्षाच्या स्थानांतराला उद्यापर्यंत स्थगिती; ‘डॉक्टर ट्री’ला सविस्तर प्रतिज्ञापत्र देण्यास मुदतवाढ

Porvorim Banyan Tree: पर्वरी उड्डाण पुलाच्या कामावेळी पर्यायी रस्त्यांच्या कामात अडथळा असलेेली झाडे तोडण्यास पर्यावरणप्रेमींनी विरोध केला होता.
Porvorim Banyan Tree
Porvorim Banyan TreeDainik Gomantak
Published on
Updated on

Porvorim Banyan Tree Road Widening Issue

पणजी: पर्वरी येथे सुरू असलेल्या उड्डाण पुलाच्या कामाच्या ठिकाणी रस्ता रुंदीकरणामध्ये वडाकडे येथील स्थानिकांचे श्रद्धास्थान असलेल्या वारसा वटवृक्षाच्या स्थानांतरास मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिलेली स्थगिती आणखी दोन दिवस वाढवली आहे.

या वटवृक्षाचे स्थानांतर कशा पद्धतीने केले जाणार याची सविस्तर माहिती देणारा अहवाल ‘डॉक्टर ट्री’ या तज्ज्ञ एजन्सीने आज गोवा खंडपीठाला सादर करणे आवश्‍यक होते मात्र तो सादर करण्यास वेळ मागितल्याने ही सुनावणी येत्या गुरुवारी (२३ रोजी) ठेवण्यात आली आहे.

Porvorim Banyan Tree
Tree Collapses At Arambol: ‘गेस्ट हाऊस’वर झाड कोसळून लाखाची हानी; हरमल येथाील दुर्घटना

पर्वरी उड्डाण पुलाच्या कामावेळी पर्यायी रस्त्यांच्या कामात अडथळा असलेेली झाडे तोडण्यास पर्यावरणप्रेमींनी विरोध केला होता. सहा जुनाट झाडांपैकी पाच झाडे स्थानांतर करण्यात आली. मात्र येथील श्रद्धास्थान असलेल्या वटवृक्षाच्या स्थानांतर पद्धतीबाबत मागील सुनावणीवेळी दिलेल्या माहितीबाबत याचिकादाराने असमाधान व्यक्त केले. त्यामुळे पुढील सुनावणीवेळी ‘डॉक्टर ट्री’ एजन्सीने सविस्तर माहिती देणारे प्रतिज्ञापत्र सादर करावे व तोपर्यंत या वटवृक्षाचे स्थानांतर करू नये, असे निर्देश खंडपीठाने दिले होते.

Porvorim Banyan Tree
Bronzeback Tree Snake: पश्चिम घाटात या सापाचे अस्तित्व आहे की नाही? गोव्यातील संस्थेच्या संशोधनातून मिळालं उत्तर

पर्वरी ते गिरी यादरम्यान सुरू असलेल्या उड्डाण पुलाच्या कामावेळी अनेक जुनाट झाडे तोडण्यात येणार असल्याने त्याला विरोध करण्यात आला होता. शिवोली येथील झाडांच्या कत्तलीसंदर्भातील जनहित याचिका प्रलंबित असतानाच पर्वरीतील झाडांच्या कत्तलीचीही न्यायालयाने दखल घेतली होती. जुनाट झाडे तोडण्यास हरकत घेतल्यानंतर ही झाडे न तोडता त्यांचे स्थानांतर केले जाईल, अशी माहिती सरकारतर्फे देण्यात आली होती. हे स्थानांतर योग्य पद्धतीने व्हावे, यासाठी तज्ज्ञांचा समावेश असलेल्या ‘डॉक्टर ट्री’ या एजन्सीला काम दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com