Baga Goa tourist trouble Dainik Gomantak
गोवा

Tourist Chaos Goa: बंगळूरच्या पर्यटकाचा बागात हैदोस!! अनेक गाड्यांना धडक, स्थानिकांना शिवीगाळ; जमावानं ठेवलं बांधून

Bengaluru Tourist Chaos News: बंगळूरुहून आलेल्या या पर्यटकाने भाड्याची कार चालवत असताना अनेक वाहनांना धडक दिली होती

Akshata Chhatre

बागा: गोवा जरी पर्यटनासाठी प्रसिद्ध असला तरीही काही पर्यटक इथे येऊन दारूच्या नशेत बेभान वागतात, बेधुंद होऊन वावरतात आणि याचा त्रास स्थानिकांना सहन करावा लागतो. शनिवारी (दि. १७) पहाटे बागा परिसरात एका पर्यटकाने अक्षरशः गोंधळ उडवून दिल्याने भल्या पहाटे परीसरात खळबळ मातली होती. बंगळूरुहून आलेल्या या पर्यटकाने भाड्याची कार चालवत असताना अनेक वाहनांना धडक दिली होती.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार हा पर्यटक दारूच्या नशेत होता आणि त्याच अवस्थेत त्याने वेगवेगळ्या गाड्यांना धडक दिली. अखेरीस त्याने एका पाण्याच्या टँकरला धडकल्यानंतर त्याची गाडी थांबली.

स्थानिकांना मारहाण आणि शिवीगाळ

या घटनेनंतर बंगळूरहून या पर्यटकाने स्थानिक लोकांशी गैरवर्तन करण्यास सुरुवात केली, त्यांना मारहाण आणि शिवीगाळ केली, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने त्याला पोलिसांच्या ताब्यात देईपर्यंत बांधून ठेवले.

सार्वजनिक सुरक्षिततेबद्दल चिंता वाढली

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले आणि बंगळूरच्या पर्यटकाला ताब्यात घेतलं. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतरही परिस्थिती नियंत्रणात नव्हती.

या व्यक्तीने पोलीस कर्मचाऱ्यांशी आणि रुग्णवाहिकेच्या नर्स व चालकासह वैद्यकीय कर्मचाऱ्यांशीही गैरवर्तन केल्याचे वृत्त आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, हा पर्यटक घटनेच्या वेळी "नशेच्या" अवस्थेत होता, ज्यामुळे परिसरातील सार्वजनिक सुरक्षिततेबद्दल चिंता वाढली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

Marcel: माशेल बाजारात पोदेरांमुळे वाहतूक कोंडी! बेशिस्त प्रकार; पंचायतीच्या सूचनांकडे दुर्लक्ष

Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

SCROLL FOR NEXT