Russian Tourists: गोवा-रशिया हवाई संपर्क होणार अधिक सुलभ! मुख्यमंत्र्यांची रशियन वाणिज्यदूतांशी साधला संवाद

Goa Tourism: मुख्यमंत्र्यांनी रशियन वाणिज्यदूतांना गोव्याच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक व पर्यावरणीय वैशिष्ट्यांची माहिती देऊन पर्यटन क्षेत्रात गुंतवणुकीसाठी आमंत्रण दिले.
CM Pramod Sawant, Ramesh Tawadkar
CM Pramod Sawant, Ramesh TawadkarX
Published on
Updated on

पणजी: रशिया हा गोव्याच्या पर्यटनाच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचा देश ठरला आहे. या पार्श्वभूमीवर गोवा-रशिया हवाई संपर्क अधिक सुलभ व प्रभावी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

यासंदर्भात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मुंबईस्थित रशियन वाणिज्यदूत इव्हान फिटिसोव्ह यांची आज आल्तिनो येथील शासकीय निवासस्थानी विविध क्षेत्रातील सहकार्याबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी विधानसभेचे सभापती रमेश तवडकर हेही उपस्थित होते.

या उच्चस्तरीय बैठकीत गोव्यातील पर्यटन वाढीसाठी रशियासोबत असलेल्या संधींचा आढावा घेण्यात आला. विशेषतः रशियन पर्यटकांची गोव्यातील वाढती आवक लक्षात घेता, यामध्ये आणखी कशी वाढ करता येईल, याबाबत सखोल संवाद झाला. तसेच पर्यटनासोबतच आर्थिक सहकार्याचे नवे मार्गही खुले करण्याच्या दृष्टीने दोन्ही बाजूंनी सकारात्मक दृष्टीकोन मांडण्यात आला.

CM Pramod Sawant, Ramesh Tawadkar
Goa Tourism: पर्यटक वाढले! पहिल्या तिमाहीत 28 लाख लोक गोव्यात; पर्यटनवृद्धीचे धोरणात्मक प्रयत्न फलदायी

मुख्यमंत्र्यांनी रशियन वाणिज्यदूतांना गोव्याच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक व पर्यावरणीय वैशिष्ट्यांची माहिती देऊन पर्यटन क्षेत्रात गुंतवणुकीसाठी आमंत्रण दिले. परस्पर संबंध दृढ करण्यासाठी दोन्ही देशांतील शासकीय, खासगी पातळीवरील सहकार्याची गरजही अधोरेखित केली.

CM Pramod Sawant, Ramesh Tawadkar
Russian Tourists: रशियन पर्यटकांची संख्या दुपटीने वाढेल! मंत्री खंवटेंनी व्यक्त केला विश्वास; फ्लाईट, हॉटेल दराबाबतही चर्चा

रशियन पर्यटकांचा मोठा वाटा; खंवटे

पर्यटनमंत्री खंवटे यांनी सांगितले की, गोवा-रशिया हवाई संपर्क अधिक सुलभ व प्रभावी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. रशियन पर्यटक हे गोव्याच्या पर्यटनात एक स्थिर आणि मोठा वाटा उचलतात. या चर्चेत रशियातून गोव्यात येणाऱ्या चार्टर फ्लाइट्समध्ये वाढ करण्याचा मुद्दा महत्त्वाचा ठरला. तसेच गोवा पर्यटनासाठी रशियन बाजारपेठेत प्रभावी मार्केटिंग रणनीती राबविण्याची गरज असल्याचेही अधोरेखित करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com