Baga Beach: खेळता खेळता खोल समुद्रात गेली, नंतर दिसेनाशी झाली; बागा किनाऱ्यावर बुडालेल्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

Calangute Baga Beach Drowning Case: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी सायंकाळी उशिरा सदर बालिका भावासोबत किनाऱ्यावर खेळत होती. तेव्हा नजर चुकवून झोया समुद्रात गेली.
Baga Beach Girl Drowning
Girl Drowning Death Incident Baga BeachDainik Gomantak
Published on
Updated on

कळंगुट: कळंगुट -बागा येथील समुद्र किनाऱ्यावर खेळता खेळता सोबतच्या व्यक्तीचे लक्ष चुकवून खोल समुद्रात गेलेल्या व पाण्यात गटांगळ्या खाणाऱ्या झोया खान (उत्तर प्रदेश) या ६ वर्षीय बालिकेला वाचवण्याचा जीवरक्षकांनी केलेला प्रयत्न अयशस्वी ठरला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी सायंकाळी उशिरा सदर बालिका भावासोबत किनाऱ्यावर खेळत होती. तेव्हा नजर चुकवून झोया समुद्रात गेली, मात्र नंतर ती दिसेनाशी झाल्याचे लक्षात आले.

Baga Beach Girl Drowning
Drowning Cases: दूधसागर, म्हादई नदीपात्रात बुडून झालेले चटका लावणारे मृत्यू! तरुणाईसह प्रशासनाने जबाबदारीने वागण्याची गरज

ज्या व्यक्तीसोबत ती आली होती, त्यांनी शोधाशोध केली, तेव्हा तेथील जीवरक्षकांना ती गटांगळ्या खात असल्याची दिसली. त्यांनी तिला बाहेर काढले. जीवरक्षकांनी तिला प्रथमोपचार

Baga Beach Girl Drowning
Goa Drowning Death: दुर्दैवी! हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये बुडून 5 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू; हडफडे येथील घटना

दिले. रुग्णवाहिकेला बोलावले. मात्र, ती वेळेत न आल्याने अत्यवस्थ स्थितीत तिला खासगी वाहनाने कांदोळी आरोग्य केंद्रात नेले. तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक तसेच कोस्टल पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून या घटनेमागील चौकशी सध्या सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com