before margao we need to clean fatorda as there is more garbage on roads says cm pramod sawant Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: मडगावनंतर आता फातोर्ड्याचा कचरा साफ करणार; मुख्यमंत्री सावंतांचं सरदेसाईंवर टीकास्त्र

इंदिरा गांधी कुटुंबाचा महात्मा गांधी कुटुंबाशी कोणताही संबंध नाही परंतु त्यांनी त्यांचे नाव केवळ राजकीय लाभासाठी वापरले आहे.

दैनिक गोमन्तक

मडगाव: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मडगावमधील मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकासाच्या अजेंड्यावर तोंडभरून कौतुक केलं. पंतप्रधान मोदींच्या विकासाच्या दृष्टीमुळेच दिगंबर कामत भाजपमध्ये आले आहेत. ते पुढे म्हणाले "मी दिगंबर आणि तमाम माडगावकरांना आश्वासन देतो की त्यांनी विकासाबाबत घाबरण्याची गरज नाही. आम्ही मडगाव स्वच्छ करून मॉडेल मतदारसंघ बनवू. यावेळी मडगावच्या आधी फातोर्डा स्वच्छ करणे गरजेचे आहे कारण फातोर्डाच्या रस्त्यावर जास्त कचरा आहेच असे म्हणत गोवा फॉरवर्ड अध्यक्ष विजय सरदेसाई यांना उद्देशून त्यांनी टोला लगावला.

(before margao we need to clean fatorda as there is more garbage on roads says cm pramod sawant)

मडगाव भाजपा कार्यकर्ता मेळाव्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत पक्षाचे अध्यक्ष सदनंद शेठ तानवडे, मडगावचे आमदार दिगंबर कामत, दामोदर नाईक, नरेंद्र सवाईकर मडगावचे अध्यक्ष दामोदर शिरोडाकर आणि इतर सुमारे 2500 कार्यकर्त्यांनी आज गोपाळ नाईक यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश केला.

काँग्रेस पक्ष कोसळत आहे

काँग्रेसने देशावर 60 वर्षे राज्य केले, आज पक्ष कोसळत आहे. महात्मा गांधींच्या नावाचा वापर करून काँग्रेसने देशावर राज्य केले प्रत्यक्षात इंदिरा गांधी कुटुंबाचा महात्मा गांधी कुटुंबाशी कोणताही संबंध नाही परंतु त्यांनी त्यांचे नाव केवळ राजकीय लाभासाठी वापरले आहे. असा आरोप मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कॉंग्रेवर केला.

....तर फातोर्ड्यात वेगळा निकाल लागला

दिगंबर कामत यांनी निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला असता तर फातोर्ड्यात वेगळा निकाल लागला असता आणि मी आमदार असतो, मात्र दिगंबर यांच्या एंट्रीमुळे दक्षिण गोव्यात पक्ष मजबूत होईल हे नक्की असे विधान यावेळी दामु नाईक यांनी केले. पुढे दिगंबर कामत म्हणाले की, मी माझ्या लोकांना विश्वासात घेऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पीएमच्या नेतृत्वामुळे भारताचा अभिमान वाढला आहे आणि येत्या काळात भारत नक्कीच महासत्ता होईल

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dance Viral Video: माझ्या डोईवरी भरली घागर रे... कोकणातल्या पोरांचा डान्स पाहून तुम्हीही म्हणाल, 'एक नंबर...'

Vice President Candidate: ठरलं! एनडीए’चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा

America Firing: गोळीबाराने हादरले 'न्यूयॉर्क'! नाइट क्लबमध्ये बेछूट गोळीबार, 3 ठार, 8 जखमी

Goa Film Festival 2025: ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित, ‘जुझे’ ठरला सर्वाधिक पुरस्कार विजेता चित्रपट

'...नाहीतर देशाची माफी मागा’, राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्तांचे थेट प्रत्युत्तर; दिली 7 दिवसांची मुदत

SCROLL FOR NEXT