T20 World Cup 2026: सिकंदर रझाचा 'विराट' पराक्रम! रोहित शर्माचा 'हा' मोठा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

Sikandar Raza T20 World Cup record: टी-२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझा याने आपल्या अष्टपैलू खेळीने क्रिकेट जगताचे लक्ष वेधून घेतले आहे.
T20 World Cup 2026
T20 World Cup 2026Dainik Gomantak
Published on
Updated on

टी-२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझा याने आपल्या अष्टपैलू खेळीने क्रिकेट जगताचे लक्ष वेधून घेतले आहे. श्रीलंकेविरुद्धच्या अटीतटीच्या सामन्यात रझाने केवळ बॅटनेच नव्हे, तर आपल्या नेतृत्वानेही इतिहास रचला आहे. या विजयासह रझाने भारतीय संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा याच्या एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

'प्लेयर ऑफ द मॅच'चा किताब

श्रीलंकेने विजयासाठी दिलेल्या १७९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सिकंदर रझाने आक्रमक पवित्रा घेतला. त्याने अवघ्या २६ चेंडूत ४५ धावांची वादळी खेळी केली, ज्यामध्ये ४ उत्तुंग षटकार आणि २ चौकारांचा समावेश होता. त्याच्या या खेळीमुळे झिम्बाब्वेने कठीण वाटणारे लक्ष्य गाठले आणि रझाला 'प्लेयर ऑफ द मॅच' म्हणून गौरवण्यात आले. या पुरस्कारासह रझाने वयाच्या ३९ व्या वर्षी नवा इतिहास लिहिला आहे.

T20 World Cup 2026
Goa vs Kerala Women's Cricket: शतकी सलामीनंतरही गोवा पराभूत, सीनियर महिला एकदिवसीय स्पर्धेत केरळचा मोठा विजय

रोहित शर्माला टाकले मागे

आयसीसीच्या मोठ्या स्पर्धांमध्ये (ICC Tournaments) 'प्लेयर ऑफ द मॅच' जिंकणारा सर्वात वयस्कर कर्णधार म्हणून आता सिकंदर रझाचे नाव अग्रस्थानी आले आहे. त्याने हे यश ३९ वर्षे ३०१ दिवस या वयात संपादन केले. यापूर्वी हा विक्रम रोहित शर्माच्या नावावर होता, ज्याने २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ३७ वर्षे ३३१ दिवस वय असताना हा पराक्रम केला होता. रझाने वयाचा अडसर दूर करत रोहितला या यादीत दुसऱ्या क्रमांकावर ढकलले आहे.

T20 World Cup 2026
Goa Crime: म्हापसा हादरलं! अपार्टमेंटजवळ अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्यानं खळबळ; मृत्यूचं कारण अद्याप गुलदस्त्यात

शोएब मलिकचा विक्रम मोडीत; आता जयसूर्याचे लक्ष्य

टी-२० वर्ल्ड कपच्या इतिहासात सर्वाधिक वयात सामनावीराचा पुरस्कार जिंकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रझाने पाकिस्तानच्या शोएब मलिकला (३९ वर्षे २७९ दिवस) मागे टाकले आहे. रझा आता या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला असून, त्याच्या पुढे केवळ श्रीलंकेचे दिग्गज सनथ जयसूर्या आहेत. जयसूर्या यांनी ३९ वर्षे ३४५ दिवस वय असताना हा मान मिळवला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com