Goa: सशक्त समाजासाठी साहित्‍य महत्त्‍वपूर्ण!

Goa: सकारात्मक बदल घडविण्यासाठी वर्तमानपत्रे आणि साहित्याचा प्रभावी वापर व्हायला हवा.
Goa | Shri Ram Pawar
Goa | Shri Ram PawarDainik Gomantak
Published on
Updated on

Goa: सकारात्मक बदल घडविण्यासाठी वर्तमानपत्रे व साहित्याचा प्रभावी वापर व्हायला हवा. बदलत्या युगाचे आणि समाजमनाचे प्रतिबिंब हे वर्तमानपत्रांबरोबरच साहित्यातूनही पडायला हवे. तरच सशक्त समाजनिर्मिती होणे शक्य आहे, असे मत दै. ‘सकाळ’चे समूह संपादक श्रीराम पवार यांनी व्यक्त केले. (Sakal Group Editor Sriram Pawar)

नागेशी-बांदोडा येथील गोमंतक साहित्य सेवक मंडळातर्फे अखिल भारतीय (Indain) मराठी साहित्य महामंडळाच्या वर्धापनदिन सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात काल रविवारी दुसऱ्या दिवशी ‘लिखित माध्यम’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्रीराम पवार वक्ते म्हणून बोलत होते. या चर्चासत्राला पुणे येथील पत्रकार श्रीधर लोणी, गोव्यातील पत्रकार राजू नाईक, साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष उषा तांबे व उपाध्यक्ष रमेश वंसकर उपस्थित होते.

Goa | Shri Ram Pawar
Goa Monsoon: तापमानवाढीमुळे ढगफुटी सदृश पाऊस!

वर्तमानपत्रातील लेखक आणि साहित्यिक यांचा जवळचा संबंध आहे. बहुतांश साहित्यिक हे वर्तमानपत्रातील लेखक आहेत. त्यामुळे प्रसारमाध्यमे आणि साहित्य यांचा एकमेकांशी एक वेगळा नातेबंध आहे. प्रसारमाध्यम (Media) आणि साहित्य हे माणसाच्या अभिरुचीला वाव देणारे प्रभावी माध्यम आहे. समाज सुधारण्यासाठी त्याकाळी वर्तमानपत्राचा जन्म झाला, पण आज आपण कुठे आहोत, त्याचा विचार व्हायला हवा.

एकाधिकारशाही, द्वेषमूलक स्थितीविरुद्ध आवाज उठवण्याची गरज आहे काय, याचाही साहित्यिकांनी विचार करायला हवा. वर्तमानपत्रे आपले काम करून जातात, पण साहित्याचे प्रतिबिंब त्यात पडायला हवे, असे श्रीराम पवार म्हणाले.

Goa | Shri Ram Pawar
Goa Congress: 2,500 समर्थकांसह 'हा' काँग्रेस नेता भाजपात दाखल; गळती थांबेना

तसेच, यावेळी श्रीधर लोणी, राजू नाईक यांनीही विचार मांडले. स्वागत व प्रास्ताविक उषा तांबे यांनी, सूत्रसंचालन डॉ. अनिता तिळवे यांनी तर शेवटी चित्रा क्षीरसागर यांनी आभार मानले. दरम्‍यान, पौर्णिमा देसाई यांनी स्वागत केले तर शेवटच्या सत्रात रमेश वंसकर यांनी आभार मानले.

दृकश्राव्य माध्यमावर चर्चा

दुपारच्या सत्रात ‘दृकश्राव्य'' माध्यमावर चर्चा झाली. त्‍यात देविदास आमोणकर, रविराज गंधे, तुषार बोडखे यांनी भाग घेतला. आमोणकर यांनी दृकश्राव्य माध्यमाचा प्रभावी वापर ही जागतिक क्रांती ठरली असून शाळा, विद्यालयांत त्याचा वापर होत असल्याचे नमूद केले. तर, बोडखे यांनी उत्तम साहित्याची सुरेख कलाकृती होऊ शकते, हे अनेक चित्रपटाने (Movie) दाखवून दिल्याचे सांगितले. गंधे म्हणाले की, विविध माध्यमांतील विचार हे कलाकृतीतून उत्तमरीत्या प्रदर्शित झाले आहेत. रेडिओ, दूरचित्रवाणी आणि आता मोबाईलच्या माध्यमातून अभिव्यक्ती प्रदर्षित होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com