"विधानसभेतही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारा", स्वामी ब्रह्मेशानंदाचार्य यांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन

Shivaji Maharaj statue Goa Assembly: भविष्यातील पिढी घडविण्यासाठी मंदिरातून शिवगाथा गायली पाहिजे आणि मातेच्या कुशीत जन्म घेणारा प्रत्येक बाळ शिवाजी महाराजांसारखा जन्माला आला पाहिजे.
Shivaji Maharaj statue Goa Assembly
Shivaji Maharaj statue Goa AssemblyDainik Gomantak
Published on
Updated on

सांगे : भविष्यातील पिढी घडविण्यासाठी मंदिरातून शिवगाथा गायली पाहिजे आणि मातेच्या कुशीत जन्म घेणारा प्रत्येक बाळ शिवाजी महाराजांसारखा जन्माला आला पाहिजे. महाराज हे सर्वधार्मियांचे आहेत, म्हणून विधानसभेतही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा राहिला पाहिजे, आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना स्वामी ब्रह्मेशानंदाचार्य यांनी केले.

सांगे येथे भव्य आध्यात्मिक सोहळ्याचे दिमाखात उदघाटन झाले. यावेळी जमलेल्या असंख्य अनुयायांना स्वामी ब्रह्मेशानंदाचार्यांनी मार्गदर्शन केले. राज्यातील तसेच इतर राज्यांमधील संत-महंतांच्या वंदनीय उपस्थितीमध्ये गोवा आध्यात्मिक उत्सवाचे उदघाटन भक्तिमय वातावरणात करण्यात आले. यावेळी ब्रह्मेशानंदाचार्य स्वामींसह मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मंत्री दिगंबर कामत, सुभाष फळदेसाई आणि मान्यवर उपस्थित होते.

Shivaji Maharaj statue Goa Assembly
Goa Sand Mining: रेती परवाने आणखी लांबणार, नव्‍याने जारी होण्‍याची शक्‍यता धूसर; 'सीआरझेड-4'ची आडकाठी

हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत येथील शिवस्मारकाचे लोकार्पण करण्यात आले. आध्यात्मिक उत्सवाच्या उदघाटनापूर्वी संध्याकाळी पाच वाजता भव्य मिरवणुकीची सुरुवात काकोडा येथील शासकीय पॉलिटेक्निककडून झाली. सांगे दिवाणी न्यायालयाजवळ संगमपूर शिवसाम्राज्य समितीतर्फे मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले.

मिरवणुकीत सहभागी झालेल्या ब्रह्मेशानंदाचार्य स्वामींचे पुष्पहार आणि ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. त्यानंतर मिरवणूक श्री संगमेश्वर तीरावर आली. येथे स्वामी महाराजांच्या हस्ते श्री संगमेश्वर पूजन तसेच महाआरती करण्यात आली. यावेळी वेगवेगळ्या राज्यांतून आलेले संत-महंत तसेच ब्रह्मेशानंदाचार्य स्वामींचे राज्यभरातील शेकडो अनुयायी सहभागी झाले होते.

Shivaji Maharaj statue Goa Assembly
Goa Crime: म्हापसा हादरलं! अपार्टमेंटजवळ अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्यानं खळबळ; मृत्यूचं कारण अद्याप गुलदस्त्यात

मिरवणुकीत शेकडो सुवासिनी कलश घेऊन सहभागी झाल्या होत्या. पारंपरिक घोडेमोडणीसह श्री पाईकदेव शिगमोत्सव पथकाच्या ढोल-ताशांच्या गजरात भव्य कलश यात्रा शिवस्मारकाकडे आली. या कलशांच्या पाण्याने शिवस्मारकावर महाभिषेक करण्यात आला.

या उत्सवावेळी वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी वाहतूक पोलिस तसेच सांगे पोलिस स्थानकाचे कर्मचारी सकाळपासूनच धावपळ करीत होते.

संगमपूरनगरी झाली भगवामय

काकोडा येथून सुरू झालेल्या भव्य दुचाकी, चारचाकी मिरवणुकीत हजारो शिवभक्त तसेच ब्रह्मेशानंदाचार्य स्वामींचे अनुयायी सहभागी झाले होते. दांडो ते संगमेश्वर व सांगे परिसरात विद्युत रोषणाई, भगव्या पताका, शेकडो स्वागत फलक उभारून भक्तिमय वातावरण निर्माण करण्यात आले होते. शिवभक्तांनी भगवा फेटा आणि भगवे कुर्ते परिधान केल्यामुळे संगमपूरनगरी भगवामय झाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com