Kala Academy: कलेच्या दरबारात लाचेचा बाजार! दोन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; प्रकरण दडपण्यासाठी 'अकादमी'तच रंगली होती चर्चा

Kala Academy bribery case: ‘अ’ गट नाट्य स्पर्धेतील परीक्षकांना लाच देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कला अकादमीने कर्मचारी प्रदीप गावकर आणि सुशांत नायक यांना कारणे दाखवा नोटीस बजावली.
Goa Kala Academy
Goa Kala AcademyDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: ‘अ’ गट नाट्य स्पर्धेतील परीक्षकांना लाच देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कला अकादमीने कर्मचारी प्रदीप गावकर आणि सुशांत नायक यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. तथापि, गावकर यांना कला अकादमीचे अध्यक्ष चंद्रकांत ऊर्फ बाबू कवळेकर यांनी बोलावून विचारणा केली असता, ‘मी असा प्रकार केलाच नाही’, अशी भूमिका घेत त्यांनी हात वर केले.

‘गोमन्तक’मध्ये यासंबंधीचे वृत्त प्रसिद्घ होताच नाट्यक्षेत्रासह कला अकादमीतही खळबळ उडाली. या प्रकरणाला ‘गोमन्तक’ने वाचा फोडल्याबद्दल कला अकादमीतील अनेकांनी खासगीत संतोष व्यक्त केला. हे प्रकरण कसे दाबता येईल, याविषयीही कला अकादमीच्या कार्यालयात सकाळी चर्चा झाली होती, अशी खात्रीलायक माहिती मिळाली आहे.

Goa Kala Academy
Goa vs Kerala Women's Cricket: शतकी सलामीनंतरही गोवा पराभूत, सीनियर महिला एकदिवसीय स्पर्धेत केरळचा मोठा विजय

कवळेकर कला अकादमीत दाखल झाल्यानंतर चौकशीची सूत्रे हलू लागली. त्याआधी मंत्री रमेश तवडकर आणि कला व संस्कृती खात्याचे संचालक विवेक नाईक यांनी याबाबत विचारणा केली होती. याविषयी आणखी काही ‘गोमन्तक’मध्ये छापून येणार आहे, याविषयीची भीती सर्वांच्या बोलण्यात होती. कवळेकर यांनी याबाबत कला अकादमीचे सदस्य सचिव शंकर गावकर यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. उपाध्यक्ष प्रवीण गावकरही तेथे उपस्थित होते.

असे प्रकार घडत असल्यास त्याची माहिती आहे का, अशी थेट विचारणा कवळेकर यांनी कला अकादमीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे केली. प्रदीप गावकर यांनाही बोलावले. मात्र, त्यांनी ‘अगा... असे काही घडलेची नाही’ अशी भूमिका घेतली. बातमीत उल्लेख असलेले सुशांत नाईक हे दिल्लीत असल्याने ते कवळेकर यांच्यासमोर चौकशीसाठी उपस्थित राहू शकले नाहीत. कारणे दाखवा नोटीसीला उत्तर देण्यास त्यांना सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

कला व संस्कृती खात्याचे संचालक विवेक नाईक यांनी सांगितले, की याविषयी अधिकृतपणे आज तक्रार दाखल केलेली नाही. तरीही ‘गोमन्तक’मधील बातमी वाचून कला अकादमीच्या सदस्य सचिवांकडून काय झाले आहे, याचा अहवाल मागितला आहे. कला अकादमी ही स्वायत्त संस्था असल्याने खाते थेट कारवाई करू शकत नाही.

Goa Kala Academy
Goa Open Arts Festival: कला, संस्कृती, संगीताचा उत्सव! गोवा ओपन आर्टस फेस्टिवल; काय असणार कार्यक्रम? वाचा..

सुपारी आंदोलनकर्ते कुठे गेले? : गावडे

कला अकादमीचे माजी अध्यक्ष आणि माजी कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी, माझ्या काळात असे प्रकार घडत नव्हते, असे सांगितले. असे प्रकार झाले असते तर ते मी अजिबात खपवून घेतले नसते. दोषींवर तात्काळ कारवाई केली असते, असे सांगून ते म्हणाले, ‘माझ्या काळात सुपारी घेऊन आंदोलन करणारे कुठे गेले? त्यांनी आता हे काय चाललेय, याची विचारणा करावी.’

‘गोमन्तक’चे वृत्त वाचून धक्का बसला

कला व संस्कृती मंत्री रमेश तवडकर यांनी आज ‘गोमन्तक’ वाचल्यावर याची माहिती मला शुक्रवारी द्यावी, असा आदेश कला अकादमीच्या प्रशासनाला दिला. त्यांनी ‘गोमन्तक’ला सांगितले, की संवेदनशील व्यक्ती या नात्याने मला अशा गोष्टी घडतात, हे वाचून धक्का बसला. साहजिकपणे अहवाल मिळाल्याशिवाय पुढे काय करायचे हे ठरवता येत नाही. मात्र, मी या विषयाची गंभीर दखल निश्चितपणे घेतली आहे. दोषींना सोडणार नाही.

असा प्रकार घडला असल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल. असे प्रकार कलेच्या प्रांगणात घडू नयेत. स्पर्धेत सहभागी होताना परीक्षकांचा निर्णय अंतिम व बंधनकारक असेल, असे लिहून देणारेच नंतर असे प्रयत्न करत असतील तर ते गंभीर आहे.

- बाबू कवळेकर, अध्यक्ष, कला अकादमी

रंगभूमीला लांच्छन लावणारी घटना

नाट्यस्पर्धेचा निकाल बदलण्यासाठी परीक्षकांवर दबाव आणला जातो, ही कला क्षेत्रासाठी अतिशय शरमेची बाब आहे. गोव्याच्या रंगभूमीला लांच्छन लावणारी ही दुर्दैवी घटना असून यात जे कोणी दोषी असतील, त्यांच्यावर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे, असे मत ज्येष्ठ नाट्यकर्मी देविदास आमोणकर यांनी व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com