Bandodkar T-20 League  Dainik Gomantak
गोवा

Bandodkar T-20 League: बांदोडकर करंडक! जीनोसमोर साळगावकर क्लबचे आव्हान

स्पर्धेच्या उपांत्य फेरीत बुधवारी साळगावकर क्लबने यजमान पणजी जिमखान्यास १७ धावांनी नमविले

किशोर पेटकर

Bandodkar T-20 League: बांदोडकर करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेत जीनो स्पोर्टस क्लब आणि साळगावकर क्रिकेट क्लब यांच्यात विजेतेपदासाठी लढत होईल. अंतिम सामना गुरुवारी (ता. २०) कांपाल येथील भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर खेळला जाईल.

स्पर्धेच्या उपांत्य फेरीत बुधवारी साळगावकर क्लबने यजमान पणजी जिमखान्यास १७ धावांनी नमविले, तर जीनो स्पोर्टस क्लबने चौगुले स्पोर्टस क्लबवर सात विकेट राखून मात केली. जीनो क्लबच्या सोहराब धालिवाल याने आक्रमक नाबाद शतक नोंदवत संघाला १५.२ षटकांत सोपा विजय मिळवून दिला.

संक्षिप्त धावफलक

चौगुले स्पोर्टस क्लब: २० षटकांत ८ बाद १७५ (कश्यप बखले ३१, दिव्यांश २८, कृष्णा ठाकूर २५, शुभम गजिनकर २८, समीत आर्यन मिश्रा २-२१, मयांक रावत ३-२८) पराभूत विरुद्ध जीनो स्पोर्टस क्लब: १५.२ षटकांत ३ बाद १७८ (ईशान गडेकर ३९, सोहराब धालिवाल नाबाद १०१- ५२ चेंडू, ६ चौकार, ८ षटकार, मयांक रावत नाबाद २९, कृष्ण ठाकूर २-२७).

साळगावकर क्रिकेट क्लब: २० षटकांत ९ बाद १५० (अमोघ देसाई ३८, आदित्य सूर्यवंशी २७, सुबोध भट्टी २८, शुभम तारी ३-३६, अचित शिगवण ३-३४, शुभम देसाई २-२८) विजयी विरुद्ध पणजी जिमखाना: १९.३ षटकांत सर्वबाद १३३ (स्नेहल कवठणकर ४४, निनाद रठवा २९, अथर्व अंकोलेकर २-२२, लकमेश पावणे २-२६, दीपराज गावकर ३-२९).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali 2025: ..पूर्वी सुकलेल्या गवतापासून नरकासूर बनायचा, गुराख्याच्या सेवेसाठी समर्पित केलेला गोडवा पाडवा; गोव्यातील दिवाळी

Goa Accident: पेडणेजवळ थरार! महिंद्रा कार खांबावर आदळली, गाडीचा चक्काचूर; नवरा-बायको गंभीर जखमी

Goa Politics: 'देवाची शपथ घेऊनसुद्धा काँग्रेसचे आमदार भाजपसोबत गेल्याचा इतिहास'! आतिषी यांची सडेतोड मुलाखत; Watch Video

Diwali 2025: दिवाळी तोंडावर तरी दुकानदार, विक्रेते चिंतेत! ‘ऑनलाईन’ खरेदीचा फटका; घोंगावतेय पावसाचे सावट

Goa Live News: पंचांना अपात्र ठरवण्याचा आदेश रद्द!

SCROLL FOR NEXT