IPL 2023: भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलमध्ये पदार्पण केले.
मध्यमगती गोलंदाज अर्जुन रविवारी मुंबई इंडियन्सकडून खेळण्यासाठी आला. त्या सामन्यात त्याला विकेट मिळाली नसली तरी त्याने शानदार गोलंदाजी केली.
अर्जुनला सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात पहिली विकेट मिळाली, जेव्हा त्याने शेवटच्या षटकात अब्दुल समदला सुनियोजितरित्या धावबाद केले. त्यानंतर, त्याने भुवनेश्वर कुमारला रोहित शर्माकडे झेलबाद केले. सामना संपल्यानंतर तो याबाबत बोलत होता.
दरम्यान, मॅच प्रेजेंटेशनच्या वेळी अर्जुन म्हणाला की, "आयपीएलमध्ये (IPL) पहिली विकेट मिळणे माझ्यासाठी खूप खास होते. सामना सुरु असताना फक्त आमच्या हातात काय होते, प्लॅन काय आहे आणि तो प्लॅन कसा एक्झिक्युट हेच लक्षात होते. त्यावेळी मला फक्त गोलंदाजीवर लक्ष केंद्रिय करायचे होते. मला गोलंदाजी करायला आवडते."
दुसरीकडे, सचिनसोबत काय बोलणे होते याबद्दल अर्जुन म्हणाला की, "आम्ही (सचिन तेंडुलकर) क्रिकेटबद्दलच सातत्याने बोलतो, खेळापूर्वी रणनीतीवर चर्चा करतो. विशेष म्हणजे, ते मला सामन्यासाठी कशी तयारी करायची याविषयी मार्गदर्शन करतात.'
पुढे, सचिनबाबत बोलताना अर्जुन म्हणाला की, "आम्ही (सचिन तेंडुलकर आणि तो) जास्तीत जास्त क्रिकेटबद्दलच बोलतो, खेळापूर्वी रणनीतीवर चर्चा करतो. ते मला सांगतात की, सामन्यासाठी कशी तयारी करायची.
या सामन्यात मी फक्त माझ्या रीलीजवर लक्ष केंद्रित केले. त्याचबरोबर, लाईन आणि लेन्थनुसार गोलंदाजी केली. जर बॉल स्विंग झाला, तर तो आपल्यासाठी बोनस, मात्र तसे झाले नाही तर ठीक आहे."
वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकरने शेवटचे षटक टाकले, जिथे त्याने भुवनेश्वर कुमारची (Bhuvneshwar Kumar) विकेट घेतली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.