Land Grabbing Case Dainik Gomantak
गोवा

Land Grabbing Case : जमीन हडपप्रकरणी 'मास्टरमाइंड'ला सलग पाचव्यांदा जामीन

जेएमएफसीने सलग पाचव्या अटकेसाठी मोहम्मदला पंधरा हजारचे जामीन मंजूर केले.

गोमन्तक डिजिटल टीम

राज्यातील जमीन हडप प्रकरणाचा तपास सध्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) आहे. कळंगुट येथील सर्वे क्रमांक 24/5 व 24/2 मधील डेब्रा मास्कारेन्हस गोईश परेरा ऊर्फ डेब्रा फातिमा ओलिव्ह मास्कारेन्हस यांची जमीन हडप केल्याप्रकरणी गुन्हे अन्वेषण शाखेने मोहम्मद सुहेलला पाचव्यांदा अटक केली होती.

दरम्यान, मोहम्मद सुहेलला म्हापसा न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग (JMFC) न्यायालयात हजर केले असता जेएमएफसीने सलग पाचव्या अटकेसाठी जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने पंधरा हजारचे दोन जामीन भरण्याचे निर्देश दिले आहेत.

मोहम्मद सुहेल याचा राज्यातील बहुतेक जमीन हडप प्रकरणांमध्ये लागेबांधे आहेत. डेब्रा मास्कारेन्हस गोईश परेरा यांनी दिलेल्या तक्रारीत बार्देश येथील उपनिबंधक कार्यालयात जाऊन त्यांच्या जमिनीची चौकशी करून माहिती घेतली असता, त्यांच्या जमिनीची विक्री झाली असल्याचे उघडकीस आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT