राज्यातील जमीन हडप प्रकरणाचा तपास सध्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) आहे. या प्रकरणाचा मास्टरमाईंड महमंद सोहेल शफी उर्फ मायकल याच्या मुसक्या आवळण्यात पथकाला यश आले आहे. एसआयटीने गुरुवारी रात्री ही कारवाई केली. मास्टरमाईंड महमंद अनेक प्रकरणांत गुंतल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
दरम्यान, शुक्रवारी संशयिताला म्हापसा जीएमएफसी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 4 दिवसांची कोठडी मंजूर केली आहे. तसेच याप्रकरणाची पुढील सुनावणी 20 डिसेंबरला होणार आहे. एसआयटीने या प्रकरणामध्ये गुंतलेल्या आणखी लोकांना पकडण्यासाठी आणि विक्री कराराची कागदपत्रे परत मिळवण्यासाठी 9 दिवसांची पोलिस कोठडी मागितली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, महमंद शफी याला दुसऱ्या एका जमीन हडप प्रकरणात जुनमध्ये अटक केली होती. मात्र, न्यायालयाने जामिन दिल्यानंतर तो फरार झाला होता. काही दिवसांपासून पोलिस महमंद आणि त्याच्या साथीदाराच्या शोधासाठी प्रयत्नरत होते. हे दोन्ही संशयित एसआयटीला हवे असून यांच्याकडून या प्रकरणाची अधिक तपशील मिळवणे गरजेचे आहे. 2013 आणि 2014 साली सुद्धा महमंदविरोधात 3 गुन्हे नोंद आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.