Land Grabbing Case : कळंगुट जमीन हडप प्रकरणात सुहैलला पाचव्यांदा अटक

आतापर्यंत त्याला चार प्रकरणांमध्ये अटक करून सशर्त जामीन मिळाला आहे.
Land Grabbing Case
Land Grabbing CaseDainik Gomantak

कळंगुट येथील सर्वे क्रमांक 24/5 व 24/2 मधील डेब्रा मास्कारेन्हस गोईश परेरा ऊर्फ डेब्रा फातिमा ओलिव्ह मास्कारेन्हस यांची जमीन हडप केल्याप्रकरणी गुन्हे अन्वेषण शाखेने संशयित महंमद सुहैल याला अटक केली. आतापर्यंत त्याला चार प्रकरणांमध्ये अटक करून सशर्त जामीन मिळाला आहे.

विशेष म्हणजे, जमीन हडप प्रकरणात त्याला पोलिसांनी पाचव्यांदा अटक केली आहे. त्याला न्यायालयाने 5 दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. राज्यातील बहुतेक जमीन हडप प्रकरणांमध्ये त्याचे लागेबांधे आहेत.

डेब्रा मास्कारेन्हस गोईश परेरा यांनी दिलेल्या तक्रारीत बार्देश येथील उपनिबंधक कार्यालयात जाऊन त्यांच्या जमिनीची चौकशी करून माहिती घेतली असता, त्यांच्या जमिनीची विक्री झाली असल्याचे उघडकीस आले.

Land Grabbing Case
Durgadas Kamat: सुनावणी रात्री अकरा वाजता! कामत पोहोचलेही पण पुढे काय झाले? तुम्हीच पाहा

या विक्री प्रकरणामध्ये अंतोनिता ऊर्फ अंतोनेता डॉमनिक फर्नांडिस सँड्रिक फर्नांडिस, मारिया अँजेला ऊर्फ मारिया अँजेली फर्नांडिस व इतरांनी सूत्रधार महंमद सुहैल याच्याशी संगनमत केल्याचे नमूद करून त्यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी बनावट दस्तावेज तयार करून जमीन हडप केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com