Aryan Singh Dadiala Dainik Gomantak
गोवा

49 तास, 44 मिनिटांत 210 किमी अंतर पोहून पार! आर्यन सिंगची समुद्रातील चित्तथरारक झुंज; अजितदादांना अनोखी श्रद्धांजली

Aryan Singh Dadiala Swimming Ajit Pawar Tribute: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आर्यनने ही मोहीम हाती घेतली होती. हा विक्रम त्याने दादांना समर्पित केला आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: अथांग सागराशी झुंज देत मुंबईचा २४ वर्षीय आंतरराष्ट्रीय जलतरणपटू आर्यन सिंग दादियाला याने सलग ४९ तास ४४ मिनिटे ०४ सेकंद पोहत २१० किलोमीटरचे अंतर पार करत अभूतपूर्व कामगिरीची नोंद केली आहे. खुल्या समुद्रातील मॅरेथॉन स्विमिंगमध्ये अशी कामगिरी करणारा तो देशातील एकमेव जलतरणपटू ठरू शकतो. या विक्रमामुळे क्रीडा विश्वातून त्याचे कौतुक होत आहे.

महाराष्ट्र सीमेजवळून सुरू झालेली ही मोहीम गोवा–कर्नाटक सीमेपर्यंत पोहोचून पुन्हा केरी येथे समाप्त झाली. एकूण २१० किमीचा हा प्रदीर्घ प्रवास आर्यनने कोणतीही विश्रांती न घेता पूर्ण केला. या कालावधीत त्याने प्रखर उन्हाचा तडाखा, काळोखी रात्र तसेच जेलीफिशच्या धोक्याचा सामना केला. विशेष म्हणजे, संपूर्ण मोहिमेदरम्यान तो केवळ द्रव आहारावर अवलंबून होता.

‘फिशरमॅन पेले’ म्हणून प्रसिद्ध असलेले फ्रान्सिस पेले यांनी आर्यनच्या या कामगिरीचे तोंडभरून कौतुक केले. ते म्हणाले, “समुद्रात सलग दोन-तीन तास पोहणे किती कठीण असते, हे आम्हा मच्छीमारांना ठाऊक आहे. मात्र, आर्यनने रात्रंदिवस तेही अन्नाशिवाय, सलग २१० किलोमीटर पोहण्याचा पराक्रम केला. ही कामगिरी अभूतपूर्व आहे. मी खरोखरच प्रभावित झालो.’’

पित्याच्या डोळ्यांत आनंदाश्रू

आर्यनने २१० किलोमीटरचे अंतर यशस्वीरित्या पार करत विक्रम रचल्याने त्याचे वडील सुरजीत सिंग दादियाला यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटले. डाव्या हाताला जेलीफिशने दंश केल्यानंतरही आर्यनने हार मानली नाही.

अजितदादांना अनोखी श्रद्धांजली

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आर्यनने ही मोहीम हाती घेतली होती. हा विक्रम त्याने दादांना समर्पित केला आहे. या ऐतिहासिक कामगिरीबद्दल गोवा जलतरण संघटनेचे अध्यक्ष योगिराज कामत यांनी त्याचे अभिनंदन करत, “गोव्याच्या किनारपट्टीवर एका युवकाने केलेली ही अभूतपूर्व कामगिरी अनेकांसाठी प्रेरणादायी आहे,” असे सांगितले.

काळोखी रात्र, प्रचंड वारे आणि जेलीफिशशी संघर्ष

समुद्रात प्रत्येक स्ट्रोकसोबत आर्यनला कठोर आव्हानांचा सामना करावा लागला. रात्री पाण्यात शून्य दृश्यमानता असताना समोरून येणारे प्रचंड वारे त्याला मागे ढकलत होते. जेलीफिशच्या दंशामुळे रात्रभर अंगाची जळजळ होत होती. अशा जीवघेण्या परिस्थितीतही त्याने जिद्द सोडली नाही आणि सातत्याने तो अंतर पार करत राहिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: बिहार बंददरम्यान विद्यार्थ्यांवर थेट 'एके-47' ने गोळीबार! पोलिसांचा अमानुष चेहरा कॅमेऱ्यात कैद; एसआयटी जवान डिस्मिस

America New Visa Policy: ऑनलाईन फ्रॉड अन् सेक्सटॉर्शन करणाऱ्यांना झटका! अमेरिकन नागरिकांना लुटणाऱ्या चिनी गँगवर निशाण्यावर; ट्रम्प सरकारची नवी व्हिसा पॉलिसी जाहीर

Weather Update: राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम! IMD कडून 31 जुलैपर्यंत 'यलो अलर्ट'; मुसळधार सरींचा अंदाज

CJP Protest Violence: 'सीजेपी' आंदोलनातील हिंसेमागे पाकिस्तान कनेक्शन! दंगल घडवण्यासाठी भामट्यांनी वापरले 'ब्लूटूथ ॲप्स'; पोलिस तपासात हायटेक नेटवर्क उघड

Who is Samreen Kaur: टीम इंडियाचा मॅचविनर 'समरीन'च्या प्रेमात क्लिन बोल्ड! गर्लफ्रेंडसोबतचा रोमँटिक फोटो शेअर; पाहा कोण आहे ती?

SCROLL FOR NEXT