Ajit Pawar Passed Away: पर्वरीतील कार्यालयाचे उद्घाटन अधुरेच! फेब्रुवारीतील 'दादांचा' नियोजित गोवा दौरा कायमचा रद्द

Ajit Pawar visit to Goa February 2026: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्‍या निधनाने राष्‍ट्रवादी काँग्रेस पक्षाचे न भरून येणारे नुकसान झाले आहे.
Ajit Pawar visit to Goa February 2026
Ajit Pawar Passed AwayDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्‍या निधनाने राष्‍ट्रवादी काँग्रेस पक्षाचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. गोव्‍यातही पक्ष सक्रिय झाला होता. मागील सहा महिन्यांपासून जनसंपर्क वाढविण्यात आला होता. पर्वरी येथे पक्षाच्या कार्यालयाचे काम पूर्ण होत आले आहे. त्‍याच्‍या उद्‍घाटनासाठी अजितदादा फेब्रुवारीत गोव्यात येणार होते, अशी माहिती राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष चैतन्य ऊर्फ सनी मानकर यांनी दिली.

महाराष्‍ट्रासह राष्ट्रवादीचे कार्य इतर राज्यांतही वाढविण्याचे काम सुरू होते. अजितदादा यांच्या आकस्मिक जाण्याने माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते आज पोरके झाले आहेत, असेही मानकर म्‍हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्‍यक्ष जुझे फिलिप डिसोझा म्‍हणाले, मी स्‍वत: अजितदादांना अनेकदा भेटलो. त्यांचा कामाचा धडाका पहाटे ५ वाजल्यापासून सुरू व्हायचा. त्यांच्या जाण्याने राष्ट्रवादी पक्षाची, व महाराष्‍ट्राची मोठी हानी झाली आहे.

Ajit Pawar visit to Goa February 2026
Ajit Pawar Passed Away: महाराष्ट्रातून दुःखद बातमी! उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन

महाराष्ट्राने कर्तबगार नेता गमावला : सावंत

अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनामुळे दु:ख झाले आहे. महाराष्ट्राने कर्तबगार नेतृत्व गमावले आहे. तीन दशकांहून अधिक काळ चाललेल्या त्यांच्या सामाजिक, राजकीय कारकिर्दीने महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये मोलाचे योगदान दिले. मी पवार कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे, अशा शब्‍दांत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्‍या भावना व्‍यक्त केल्‍या.

Ajit Pawar visit to Goa February 2026
Ajit Pawar Passed Away: "महाराष्ट्रानं कर्तबगार नेतृत्व गमावलं!" अजित पवारांच्या निधनावर गोव्याच्या मुख्यमंत्र्यांसह दामू नाईक, युरींनी वाहिली श्रद्धांजली

जुझे फिलिप डिसोझा, प्रदेशाध्‍यक्ष-राष्ट्रवादी काँग्रेस

अजितदादांच्‍या निधनाची बातमी कळताच मोठा धक्का बसला. पक्षसंघटना आणि पवार कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आत्ता कुठे दोन्ही गटांतील वाद मिटून ते एकत्र येण्याची आनंदवार्ता आमच्या कानी पडली होती. आम्ही देखील आनंदी झालो होतो. मात्र अशातच ही दुर्घटना घडल्याने पक्ष, कार्यकर्त्यांवर मोठे संकट कोसळले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com