Colvale Jail: कोलवाळ कारागृहातील हल्ला प्रकरणात आणखी 4 कैद्यांना अटक; आरोपींची संख्या सातवर

Colvale Central Jail Attack Case: नव्याने अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी टारझन पार्सेकर आणि सागर पाटील यांची म्हापसा न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
Colvale Central Jail Attack Case
Colvale JailDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

म्हापसा: अतिसुरक्षित मानल्या जाणाऱ्या कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात कैदी विकट भगत याच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा तपास करताना पोलिसांनी मोठी कारवाई केली असून, याप्रकरणी आणखी चार संशयित कैद्यांना अटक केली आहे. त्यामुळे या प्रकरणातील अटकेतील आरोपींची एकूण संख्या सातवर पोहोचली आहे.

नव्याने अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी टारझन पार्सेकर आणि सागर पाटील यांची म्हापसा न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे, तर आकाश मुदराज आणि झाकिऊल्ला खाझी यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यापूर्वी बाबू बालेकर, रामकृष्ण बालेकर आणि मंथन च्यारी या तिघांना अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले होते.

Colvale Central Jail Attack Case
Goa Theft: मालकाच्या विश्वासाचा गैरफायदा घेत 4.30 लाखांचा ऐवज लंपास; केरळमधील दाम्पत्याला अटक

या कटात सहभागी असल्याचा संशय असलेले अन्य कैदी पीटर, व्यंकटेश स्वामी आणि अफलान यांनाही लवकरच औपचारिकरीत्या ताब्यात घेतले जाणार आहे. या घटनेनंतर कारागृहाचे उपअधीक्षक अनिल गावकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोलवाळ पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १३२, ६१(२) आणि १०९(१) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.