Rohit Sharma Captaincy: 'मी तयार नव्हतो...' रोहित शर्माने मुलाखतीत सांगितली पडद्यामागची रंजक गोष्ट; काय म्हणाला नेमका?

Rohit Sharma on Becoming Captain: आयपीएल 2027 पूर्वी मुंबई इंडियन्सने रोहित शर्माकडे पुन्हा कर्णधारपद सोपवले. तब्बल तीन वर्षांनंतर तो पुन्हा संघाचे नेतृत्व करताना दिसेल.
Rohit Sharma Captaincy
Rohit Sharma CaptaincyDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Rohit Sharma on Becoming Captain: आयपीएल 2027 पूर्वी मुंबई इंडियन्सने रोहित शर्माकडे पुन्हा कर्णधारपद सोपवले. तब्बल तीन वर्षांनंतर तो पुन्हा संघाचे नेतृत्व करताना दिसेल. रोहित पुन्हा कर्णधार झाल्याने चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान, रोहितचा एक व्हिडिओ समोर आला असून, सुरुवातीला त्याला पुन्हा कर्णधार व्हायचे नव्हते, पण नंतर त्याने आपला निर्णय बदलला, असे त्याने स्वतः सांगितले.

मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर शेअर केलेल्या मुलाखतीत रोहितने आकाश अंबानीसोबत झालेल्या भेटीबद्दल सांगितले. मी रितिकाशी बोलत असताना आकाशचा फोन आला. त्यानंतर आम्ही भेटलो आणि संघाच्या भविष्याबाबत चर्चा केली, असे रोहित म्हणाला. याच संभाषणात आकाश अंबानीने त्याला कर्णधारपदाचा प्रस्ताव दिला.

Rohit Sharma Captaincy
Rohit Sharma Record: रोहित शर्माचा पुन्हा एकदा फ्लॉप शो! न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत खराब फलंदाजी करत नोंदवला कारकिर्दीतील सर्वात लाजिरवाणा रेकॉर्ड

सुरुवातीला मी या जबाबदारीसाठी तयार नाही, असे मला वाटले. मी घरी जाऊन विचार करतो, असे त्यांना सांगितले. घडलेल्या गोष्टींमुळे मी ही जबाबदारी पेलू शकेन की नाही, याबाबत मला शंका होती. संघाला कर्णधार म्हणून माझी गरज आहे असे मी म्हणत नाही, पण संघाला योग्य दिशेची गरज असल्याचे मला आतून जाणवले, असेही त्याने स्पष्ट केले.

Rohit Sharma Captaincy
Rohit Sharma Catch: वयाच्या 39व्या वर्षी रोहित शर्माची मैदानात 'चित्त्यासारखी' झेप! हवेत डाइव्ह मारत पकडला भन्नाट झेल, पाहा VIDEO

रोहित पुढे म्हणाला की, मी ही टीम तयार केली आहे आणि दहा वर्षे नेतृत्व केले. त्यामुळे ही संधी आणि आव्हान पुन्हा स्वीकारायला काय हरकत आहे, असा विचार मी केला. 2020च्या आयपीएलनंतर मुंबई इंडियन्सने जेतेपद जिंकलेले नाही. त्या काळापासून संघाच्या कामगिरीवर रोहितने भाष्य केले. आम्ही मैदानावर ज्या पद्धतीने खेळत होतो, त्याबद्दल आम्हाला खंत वाटत होती. ही बाब फक्त एका-दोन खेळाडूंची नसून संपूर्ण संघाची आहे. आम्ही पात्र ठरलो नाही यापेक्षा आम्ही चांगला खेळ करु शकलो नाही आणि जबाबदाऱ्या नीट पार पाडू शकलो नाही, याची जास्त खंत वाटली, असे रोहितने सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.