Goa Nightclub Fire Dainik Gomantak
गोवा

Goa Nightclub Fire: गोव्यात भ्रष्टाचार बोकाळला! हडफडे दुर्घटनेला सरकारी व्यवस्थाच जबाबदार, माजी सनदी अधिकारी एल्विस गोम्स यांची 'न्यायालयीन चौकशी'ची मागणी

Judicial Inquiry Demand: गोव्‍यात वरपासून खालपर्यंत भ्रष्‍टाचार बोकाळला असून त्‍यामुळेच अशा दुर्घटना घडतात. भविष्‍यात अशा दुर्घटना घडू नयेत यासाठी आताच कडक पाऊले उचलणे गरजेचे आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव: हडफडे येथील नाईट क्‍लबच्‍या दुर्घटनेला सरकारी पातळीवर चाललेला भ्रष्‍टाचारच कारणीभूत असून त्‍यामुळे या दुर्घटनेच्‍या मुळापर्यंत जाऊन त्‍याला नेमका कोण जबाबदार आहे, हे जाणून घ्‍यायचे असल्‍यास सरकारी पातळीवरील चौकशी उपयाेगी नसून त्‍यासाठी निवृत्त न्‍यायाधीशांच्‍या अध्‍यक्षतेखाली चौकशी आयोग नेमून चौकशी करण्‍याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया माजी सनदी अधिकारी एल्विस गाेम्‍स यांनी व्‍यक्‍त केली.

गोव्‍यात वरपासून खालपर्यंत भ्रष्‍टाचार (Corruption) बोकाळला असून त्‍यामुळेच अशा दुर्घटना घडतात. भविष्‍यात अशा दुर्घटना घडू नयेत यासाठी आताच कडक पाऊले उचलणे गरजेचे आहे. त्‍यासाठी या दुर्घटनेला कोण कोण जबाबदार आहेत हे शाेधून काढून त्‍यांच्‍यावर कडक कारवाई करण्‍याची गरज आहे. आणि त्‍यासाठी न्‍यायालयीन चौकशीच व्‍हायला पाहिजे. जर सरकार यासाठी पुढाकार घेत नसेल तर न्‍यायालयाने स्‍वेच्‍छा दखल घेऊन हा आयोग स्‍थापन करावा, अशी मागणी ‘गोमन्‍तक’ टीव्‍हीच्‍या ‘साष्टीकार’ या कार्यक्रमात बोलताना केली.

‘गोमन्‍तक’चे ब्‍युरो चीफ सुशांत कुंकळयेकर यांनी ही मुलाखत घेतली असून ‘गोमन्‍तक टीव्‍ही’च्‍या फेसबुक, यु-ट्यूब व इन्‍स्‍टाग्रामवर उपलब्‍ध आहे.

...तर चौकशी ‘रुबी’सारखी वांझोटी ठरेल!

गोम्‍स म्‍हणाले, काणकोणात ‘रुबी’ इमारत कोसळून दुर्घटना घडली होती, तेव्हाही दुर्घटनेस कारणीभूत खऱ्या संशयितांना वाचविण्‍यास सरकारी अधिकाऱ्यांना बळीचे बकरे केले. शेवटी सगळेच निर्दोष मुक्‍त झाले. खरी नावे बाहेर यावीत. अन्‍यथा ही चौकशीही रुबीसारखीच वांझोटी ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Banana Production: राज्यात नारळ, काजूपाठोपाठ केळीचे बंपर उत्पादन! तरीही महाराष्ट्र-कर्नाटकातून का करावी लागतेय आयात?

Goa Industrial Estate: भूजल प्रदूषणाचा धोका! श्रीस्थळ औद्योगिक वसाहतीत मळीच्या बेकायदेशीर विल्हेवाटीवर ग्रामस्थांचा संताप; प्रशासनाची तत्काळ कारवाई!

Goa Child Health: गोव्यातील बालकांचे आरोग्य धोक्यात, कुपोषण आणि वाढ खुंटल्याने वाढली चिंता; मुलांमध्‍ये फोफावतोय ‘ॲनिमिया’

Arpora Nightclub: 'बर्च क्लब'वर कोणाचा वरदहस्त? 'त्या' वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने पोलिसांना कारवाईपासून रोखल्याचा धक्कादायक खुलासा!

अवयवांच्या प्रतीक्षेत गोव्यात 10 तर, देशात 5 वर्षांत 2805 रुग्णांचा मृत्यू, किडनीसाठी राज्यात 97 रुग्ण वेटींगवर; मन हेलावणारी आकडेवारी!

SCROLL FOR NEXT