फेब्रुवारीतच फुटला वसंताचा बहर! उन्हाचे तेज पिऊन डुलणारी फुलं सांगताहेत उन्हाळ्याची रसाळ गोष्ट

Spring flowers of Goa and India: उन्हाळ्याची चाहूल वातावरणात वाढणारी उष्णताच फक्त देते असे नाही, तर झाडांवरची रंगीबेरंगी, आकर्षक फुलेदेखील पानांवर कुर्रेबाजी करून देत असतात.
Spring flowers of Goa and India
Spring flowers of Goa and IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

उन्हाळ्याची चाहूल वातावरणात वाढणारी उष्णताच फक्त देते असे नाही, तर झाडांवरची रंगीबेरंगी, आकर्षक फुलेदेखील पानांवर कुर्रेबाजी करून देत असतात. पळस, अबोली, बहावा, बोगनवेल, जास्वंद, पंगारा, अशोक, काटेसावर या झाडांवर उन्हाचे तेज पिऊन रसरशीत तोऱ्यात फुललेली फुले डुलताना दिसतात.

आपल्याकडे गुढीपाडव्यापासून वसंत ऋतू सुरू होतो असे मानले गेले, तरी गुढीपाडव्याच्या आधीही वसंत ऋतूचे अग्रदूत बनून फुलांनी बहरलेली झाडे वळणावळणांवर खडी तालीम देत उभी असतात. खरा वसंत फेब्रुवारी महिन्यातच सुरू होतो, असे मत झाडांवर बहरलेल्या या फुलांची साक्ष देऊन अनेक जण व्यक्त करतात.

बहाव्यासारख्या वृक्षावरील सुवर्णकांती फुलांच्या संभाराचे मनोरम दर्शन शहरात, बागांमध्ये दिसते, तर पळस जंगलाचे सौंदर्य वाढवतो. फेब्रुवारी-मार्च या महिन्यांत लाल फुलांमुळे पळसाचे झाड पेटल्यासारखे दिसते. त्यामुळे ‘फ्लेम ऑफ फॉरेस्ट’ असे सार्थ नाव या झाडाला दिले गेले आहे.

पळसाच्या लाल-केसरी फुलांपासून नैसर्गिक रंग तयार होतात, जे त्या ऋतूत येणाऱ्या होळीच्या सणातही वापरले जातात. पेंडगूळ (Jungle Geranium) या फुलालाही त्याच्या रंगांमुळे जंगलाची ज्योत म्हटले जाते. झुडुपासारख्या झाडांवर फुलणारे हे फूल चार पाकळ्यांचे असते. पाच पाकळ्यांचे फूल ज्याला दिसते, ती त्या दिवशी नशीब फिदा असणारी व्यक्ती आहे, असे मानले जाते.

Spring flowers of Goa and India
Goa Tourism: गोव्यातील किनारी पर्यटनाचा आंध्र सरकारकडून अभ्यास, तीन दिवस पाहणी; शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा

अबोली हे गोव्यातच नव्हे, तर संपूर्ण भारतातील एक लोकप्रिय फूल आहे. अबोलीचा गजरा किंवा वेणी ही फक्त केसांत माळायचीच नव्हे, तर कवितांचा आणि गीतांचा ‘रोमँटिक’ विषयही झाला आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत होणाऱ्या शिरगावच्या जत्रेत देवी लईराई अबोलीच्या फुलांनी शृंगारलेली असते. गुढीपाडव्याच्या दिवशी घरावर चढवलेल्या गुढीत अबोलीचा गजरा मिरवताना दिसतो.

वाहत्या पाण्याच्या कडेला आढळणाऱ्या अशोक वृक्षावर उमललेली लाल फुले मंद, सुगंधी असतात. अशोक वृक्ष लहान, डेरेदार असतो. उमलताना पिवळी आणि नंतर शेवटी गडद लाल-नारिंगी बनणारी ही फुले औषधी गुणांसाठीही प्रसिद्ध आहेत. अनेकदा रस्त्याच्या कडेला आढळणाऱ्या उंच, सरळ वृक्षाला अशोक असे गैरसमजुतीने म्हटले जाते; पण खरा अशोक हा आपल्या अंगावर केसरयुक्त लाल फुलांची शोभा मिरवणारा असतो.

Spring flowers of Goa and India
Goa Shigmo Festival: डिचोलीत शिमगोत्सवाचा जल्लोष; सर्वत्र उत्साह, घुमचे कटर घूम; परंपरा, श्रद्धा आणि जल्लोषाचा संगम

पंगाऱ्याचे झाड काटेरी असले, तरी त्यावर फुलणारी लाल-शेंदरी रंगांची फुले आकर्षक असतात. पक्ष्यांसाठी ही फुले मेजवानी ठरतात. वसंत ऋतूच्या प्रारंभी हे झाड पर्णहीन असते; पण त्यावर फुललेल्या लाल, भडक फुलांमुळे ते झाड आपोआपच लक्ष वेधून घेते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com