T20 World Cup 2026: "नुसतं स्टार असून चालत नाही..." वर्ल्ड कपमधील अभिषेक शर्माच्या 'फ्लॉप शो' वर भडकला भारतीय दिग्गज

Manoj Tiwari on Abhishek Sharma: टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये भारतीय संघाचा युवा सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा याची कामगिरी आतापर्यंत निराशाजनक राहिली.
Manoj Tiwari on Abhishek Sharma
Manoj TiwariDainik Gomantak
Published on
Updated on

Abhishek Sharma Flop Show: टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये भारतीय संघाचा युवा सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा याची कामगिरी आतापर्यंत निराशाजनक राहिली. सुरुवातीच्या तीन सामन्यांत सलग तीन वेळा शून्यावर बाद झाल्यानंतर, वेस्ट इंडिजविरुद्धच्या 'करा किंवा मरो' अशा महत्त्वाच्या सामन्यातही अभिषेक सपशेल अपयशी ठरला. भारतासमोर 196 धावांचे मोठे आव्हान असताना अभिषेककडून एका मोठ्या खेळीची अपेक्षा होती, मात्र तो पुन्हा एकदा स्वस्तात बाद झाला. त्याच्या या सततच्या खराब फॉर्ममुळे भारताचा माजी क्रिकेटपटू मनोज तिवारी याने संताप व्यक्त केला असून अभिषेकच्या 'शॉट सिलेक्शन'वर गंभीर प्रश्न उपस्थित केले.

मनोज तिवारी याने एका क्रीडा वाहिनीशी बोलताना अभिषेक शर्माच्या खेळावर कडक शब्दांत ताशेरे ओढले. तिवारी म्हणाला की, अभिषेकने अत्यंत कमी वेळात स्टारडम मिळवले आहे, पण जर त्याला खरा 'सुपरस्टार' बनायचे असेल, तर त्याला आपल्या देशाला सामने जिंकून द्यावे लागतील. भारतीय क्रिकेटमध्ये सध्या मोठी स्पर्धा आहे आणि अनेक मॅच विनर खेळाडू रांगेत उभे आहेत, याची जाणीव अभिषेकला असायला हवी. प्रशिक्षक आणि संघ व्यवस्थापनाने त्याला पूर्ण स्वातंत्र्य दिले, याचा अर्थ असा नाही की, त्याने आपल्या विकेटची किंमत करु नये. जेव्हा तुम्ही स्वतःच्या विकेटला महत्त्व देत नाही, तेव्हाच तुमच्या बॅटमधून असे बेजबाबदार फटके निघतात, अशी टीका तिवारीने केली.

Manoj Tiwari on Abhishek Sharma
T20 World Cup 2026: रिंकू सिंह टी-20 विश्वचषकातून बाहेर? समोर आली मोठी अपडेट

वेस्ट इंडिजविरुद्धच्या (West Indies) सामन्यात अभिषेकला स्वतःची गुणवत्ता सिद्ध करण्याची सुवर्णसंधी होती, मात्र त्याने ती गमावली. केवळ फलंदाजीच नव्हे, तर क्षेत्ररक्षण करतानाही अभिषेकने दोन महत्त्वाचे झेल सोडले, ज्याचा फटका संघाला बसला. मनोज तिवारी पुढे म्हणाला की, अभिषेककडे मोठी फटकेबाजी करण्याचे कौशल्य आहे. त्याने जर एखादे षटक निर्धाव (डॉट बॉल्स) खेळले, तरी तो पुढील चेंडूंवर त्याची भरपाई करु शकतो, हे सर्वांना माहित आहे.

Manoj Tiwari on Abhishek Sharma
India T20 World Cup: भारताची सेमीफायनलची वाट बिकट! आफ्रिकेने वेस्ट इंडीजला हरवणे हिताचे; काय असणार समीकरणे? वाचा..

मात्र, सध्या तो घाईत बाद होत असून त्याच्या खेळातील सातत्य हरवले आहे. जर त्याला संघातले आपले स्थान टिकवून ठेवायचे असेल, तर त्याला आपल्या तंत्रात सुधारणा करुन जबाबदारीने खेळावे लागेल. वर्ल्ड कपसारख्या (World Cup) मोठ्या व्यासपीठावर अशा चुका परवडणाऱ्या नाहीत, असे स्पष्ट मत तिवारीने व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com