Goa Nightclub Fire: क्लब मालकांना इंडिगो विमानाने देशाबाहेर पळवलं! बेकायदेशीर पब्ज कायदेशीर करण्याचं भाजपचं षडयंत्र: विजय सरदेसाईंचा सावंत सरकारवर गंभीर आरोप

Goa Politics: सध्याच्या घटनेचा फायदा घेऊन सरकार गोव्यातील बेकायदेशीर पब्जला कायदेशीर चौकटीत आणण्याची योजना आखत असल्याचा आरोप सरदेसाई यांनी केला.
 Vijai Sardesai Alleges BJP Government
Vijai Sardesai Alleges BJP GovernmentDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्यातील बहुचर्चित 'बर्च बाय रोमियो लेन' क्लबमध्ये लागलेल्या आगीच्या घटनेनंतर गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार विजय सरदेसाई यांनी भाजप सरकारवर गंभीर आरोप केले. सध्याच्या घटनेचा फायदा घेऊन सरकार गोव्यातील बेकायदेशीर पब्जला कायदेशीर चौकटीत आणण्याची योजना आखत असल्याचा आरोप सरदेसाई यांनी केला.

आरोपींना सुरक्षितपणे देशाबाहेर पळवले

दरम्यान, आग लागलेल्या क्लबच्या मालकांनी देशातून पलायन केल्याच्या मुद्द्यावरुन सरदेसाई यांनी सरकारवर निशाणा साधला. क्लबचे मालक आधीच परदेशात पळून गेले. विशेष म्हणजे, त्यांना इंडिगो (Indigo) विमानाने सुरक्षितपणे देशाबाहेर काढण्यात आले, असा गंभीर आरोप सरदेसाई यांनी केला. हे सर्व आरोपी तपासापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत असून त्यांना राजकीय संरक्षण मिळत असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला.

 Vijai Sardesai Alleges BJP Government
Goa Nightclub Fire: एका क्षणात होत्याचे नव्हते झालं! पतीसह 3 बहिणी गमावणाऱ्या भावनांसमोर मोठे संकट; जीवनाचा आधारच हरपला

तिसऱ्या मालकावर कारवाई का नाही?

क्बलच्या मालकांवर कारवाई न करण्याबद्दल सरदेसाई यांनी सरकारला घेरले. सध्या पोलिसांनी क्लबच्या केवळ दोनच मालकांविरुद्ध एफआयआर दाखल केला. सरदेसाई यांनी दावा केला की, या क्लबमध्ये तिसरा मालक देखील आहे आणि त्याचे सत्ताधारी पक्षासोबत लागेबांधे आहेत. त्यामुळेच सरकारने राजकीय दबावापोटी अजूनपर्यंत त्या तिसऱ्या मालकाविरुद्ध कोणताही एफआयआर दाखल केलेला नाही. सरकारने मात्र 'तिसरा मालक नाही' असा दावा केला. सरकारच्या या दाव्याला आव्हान देत सरदेसाईंनी म्हटले की, त्यांच्याकडे तिसऱ्या मालकाचे पुरावे उपलब्ध आहेत आणि ते योग्य वेळी हे पुरावे लोकांसमोर सादर करतील.

बेकायदेशीर पब्जना कायदेशीर करण्याचा कट

आगीच्या दुर्घटनेनंतर सरकारने जी भूमिका घेतली, त्यावरुन सरदेसाई यांनी मोठा आरोप केला. भाजप सरकार सध्या या दुर्घटनेचा वापर करुन गोव्यातील इतर बेकायदेशीरपणे चालणाऱ्या क्लबला दंड भरुन किंवा विशिष्ट नियमावली आणून कायदेशीर चौकटीत आणण्याची योजना आखत आहे. हे एक मोठे षडयंत्र आहे, असा थेट आरोप सरदेसाईंनी केला. गोव्यात अनेक क्लब आणि नाईट क्लब हे अग्निशमन नियम, सुरक्षा मानके आणि स्थानिक कायद्यांचे उल्लंघन करुन चालवले जातात. या दुर्घटनेमुळे असे पब उघडकीस आले.

 Vijai Sardesai Alleges BJP Government
Goa Nightclub Fire: लुथरा बंधूंचा थायलंडला पळ! 'लूक लाऊट' नोटीस जारी; गोवा पोलिसांचा दिल्लीत छापा

सरदेसाई म्हणाले की, बेकायदेशीर पब्जच्या या मोठ्या जाळ्यामध्ये सत्ताधारी पक्षातील अनेक लोकांचे राजकीय साटेलोटे आहे, ज्यामुळे त्यांना अभय मिळते. दुसरीकडे मात्र, सरदेसाई यांनी केलेल्या या गंभीर आरोपांमुळे गोवा सरकारच्या अडचणी वाढल्या असून क्लबच्या मालकांना देशाबाहेर पळवून लावण्यात आले की, ते स्वतःहून फरार झाले, यावर आता अधिक तपास करण्याची गरज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com