Arpora Nightclub Fire Dainik Gomantak
गोवा

Arpora Nightclub Fire: 'बर्च' मधील मृत कामगारांना मिळाली नाही नुकसान भरपाई, 'मानवाधिकार'कडून कामगार आयुक्तांना नोटीस

Goa Arpora Nightclub Fire Update: मृत्युमुखी पडलेल्या २० कामगारांच्या कुटुंबीयांना अद्याप नुकसानभरपाई न मिळाल्याच्या प्रकरणाची गोवा मानवाधिकार आयोगाने गंभीर दखल घेतली आहे.

Sameer Amunekar

पणजी: हडफडे येथील बर्च बाय रोमिओ लेन नाईट क्लबमध्ये लागलेल्या भीषण आगीत मृत्युमुखी पडलेल्या २० कामगारांच्या कुटुंबीयांना अद्याप नुकसानभरपाई न मिळाल्याच्या प्रकरणाची गोवा मानवाधिकार आयोगाने गंभीर दखल घेतली आहे.

यासंदर्भात आयोगाने गोव्याच्या कामगार आयुक्तांना नोटीस बजावली आहे. हटिल एम्प्लॉई फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनेने २२ डिसेंबर २०२५ रोजी मानवाधिकार आयोगाकडे यासंदर्भांत तक्रार दाखल केल्याने ही कारवाई करण्यात आली.

कर्मचारी नुकसानभरपाई कायद्यानुसार मृत कामगारांच्या कायदेशीर वारसांना तत्काळ भरपाई मिळावी, यासाठी आयोगाने हस्तक्षेप करावा, अशी मागणी संघटनेने केली आहे, शनिवार, ६ डिसेंबर २०२५ रोजी रात्री पडलेल्या या दर्घटनेत २५ जणांचा मृत्यू झाला होता.

त्यापैकी २० जण हे संबंधित नाईट क्लबचे कर्मचारी होते. हे कामगार झारखंड, आसाम, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, नेपाळ येथील स्थलांतरित कामगार होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT