South Goa: दक्षिण गोव्‍यात 12 महिला विजयी! 10 मतदारसंघ होते राखीव; मंत्री शिरोडकरांची कन्‍या शिरोडा मतदारसंघातून विजयी

South goa zp election women winners: दहा मतदारसंघ महिलांसाठी राखीव होते तर कुडतरी व बाणावली या खुल्‍या मतदारसंघात काँग्रेसच्‍या आस्‍त्रा डिसिल्‍वा व लुईझा रॉड्रिगीस या निवडून आल्‍या.
Goa
GoaDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: दक्षिण गोव्‍यातील २५ पैकी १२ मतदारसंघांतून महिला उमेदवार जिंकून आल्‍या आहेत. दहा मतदारसंघ महिलांसाठी राखीव होते तर कुडतरी व बाणावली या खुल्‍या मतदारसंघात काँग्रेसच्‍या आस्‍त्रा डिसिल्‍वा व लुईझा रॉड्रिगीस या निवडून आल्‍या.

भाजपचे मंत्री सुभाष शिरोडकर यांची कन्‍या गौरी शिरोडकर या शिरोडा मतदारसंघातून जिंकून आल्‍या. उसगाव-गांजे येथून भाजपच्‍या समीक्षा नाईक, वेलिंग प्रियोळमधून मगोच्‍या अदिती गावडे, बोरीतून भाजपच्‍या पूनम सामंत यांनी विजय प्राप्‍त केला. रायमधून इनासिना पिंटो यांनी विजय मिळवत पहिल्‍यांदाच जिल्‍हा पंचायतीत गोवा फॉरवर्डचे खाते खोलले. नावेली मतदारसंघात काँग्रेसच्‍या मालिफा कार्दोज जिंकून आल्‍या.

सांगे तालुक्‍यात येणाऱ्या रिवण मतदारसंघात भाजपच्‍या राजश्री गावकर यांनी अटीतटीच्‍या लढतीत गोवा फॉरवर्डच्‍या सहिज्ञा गावकर यांच्‍यावर विजय मिळविला तर खोला येथे काँग्रेसच्‍या सुमित्रा पागी यांनी भाजपच्‍या तेजल पागी यांच्‍यावर विजय मिळविला. बार्सेत भाजपच्‍या अंजली अर्जुन वेळीप या जिंकल्‍या. कुठ्ठाळी मतदारसंघात अपक्ष मेर्सियाना वाझ या विजयी झाल्‍या.

Goa
Goa ZP Election Result: जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपचा 'मास्टरस्ट्रोक'! विरोधकांची युती न झाल्यानं फुललं कमळ; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी

नुवेत काँग्रेसचा ‘आप’ला दणका

नुवे जिल्हा पंचायत मतदारसंघात काँग्रेस आणि आम आदमी पक्ष (आप) यांच्यात अटीतटीची लढत पाहायला मिळाली. अखेर काँग्रेसचे उमेदवार अँथनी ब्रागांझा यांनी ६८३ मतांची आघाडी घेत विजय मिळवला. त्‍यांना ५७८१ मते मिळाली तर ‘आप’चे उमेदवार लुईस बार्रेटो यांना ५०९८ मते मिळाली.

Goa
Goa ZP Election Result: युती फिस्कटल्याने विरोधकांना 7 मतदारसंघांत फटका! 21 जागा जिंकण्याची गमावली संधी; 14 जागांवर समाधान

अपक्ष उमेदवार जॉन फर्नांडिस यांनी मिळवलेली १३२८ मते ही काँग्रेसच्या विजयाला हातभार लावणारी ठरली. विजयानंतर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे नेते एवर्सन वालेस यांनी सांगितले की, हा विजय म्हणजे काँग्रेस सोडून भाजपमध्‍ये गेलेल्यांना मोठी चपराक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com