Aqua Goa Mega Fish Festival 2025 Dainik Gomantak
गोवा

Goa Fish Festival: 'गोमंतकीय आणि मासेमारी एकमेकांशी जोडलेले', फिश फेस्टिवलमध्ये मंत्री खंवटेंनी सांगितले गोव्याच्या परंपरेचे महत्व

Aqua Goa Mega Fish Festival 2025: गोव्याच्या समृद्ध मासेमारी परंपरेला चालना देणाऱ्या ''एक्वा गोवा मेगा फिश फेस्टिव्हल २०२५'' चा समारोप रविवारी झाला.

Sameer Panditrao

Aqua Goa Mega Fish Festival 2025 Closing Ceremony

पणजी: गोव्याच्या समृद्ध मासेमारी परंपरेला चालना देणाऱ्या ''एक्वा गोवा मेगा फिश फेस्टिव्हल २०२५'' चा समारोप रविवारी झाला. यानिमित्त आयोजित विविध मनोरंजनाच्या कार्यक्रमांना शेकडो लोकांची उपस्थिती होती.

तीन दिवस चाललेल्या या महोत्सवाला हजारोंच्या संख्येने नागरिकांनी भेट दिली. फेस्टिव्हलने गोव्याच्या मासेमारी व्यवसायाला नवा आयाम दिला असून या महोत्सवाने राज्यातील युवकांना व्यवसायाच्या संधी असल्याचे दाखवून दिले. समारोप सोहळ्यात पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांच्यासोबत मत्स्यउद्योग मंत्री नीळकंठ हळर्णकर, मत्स्यउद्योग संचालनालयाच्या संचालिका यशस्विनी बी. आदी मान्यवर उपस्थित होते.

एक्वेरियम गॅलरी, कमर्शिअल आर्केड आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांनी लोकांना आकर्षित केले. शेवटच्या दिवशी रविवार सुट्टी असल्याने मोठी गर्दी झाली. भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी रविवारी दुपारी महोत्सवाला भेट दिली.

गोमंतकीयांना मासे हवेच : खंवटे

पर्यटन मंत्री खंवटे यांनी गोव्याच्या मासेमारी परंपरेचे महत्व सांगत, गोमंतकीय आणि मासेमारी हे एकमेकांशी जोडलेले आहेत. स्वयंपूर्ण गोवा म्हटल्यावर मूळ अधिक घट्ट करायला हवे. गोमंतकीय म्हणजे मासे आणि मासे म्हणजे गोमंतकीय आहे. शाकाहारी दिवस सोडले तर गोमंतकीयांच्या ताटात मासे हवेच.

प्रमुख आकर्षणे

महोत्सवात विविध मनोरंजन कार्यक्रम झाले. अभिनेत्री श्रुती मराठे यांची उपस्थिती विशेष आकर्षण ठरली. याशिवाय बॉलिवूड डान्स परफॉर्मन्सेस, आयएफडब्ल्यू गोवा फॅशन शो व कुटुंब व केके सोनिक यांच्या कार्यक्रम झाला.

प्रेरणा देणारा महोत्सव

मंत्री नीळकंट हळर्णकर यांनी सांगितले की, हा महोत्सव युवकांना मासेमारी व्यवसायात सहभागी होण्यासाठी प्रेरणा देणारा ठरला. मत्स्यव्यवसाय विभागाच्या विविध योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हे या महोत्सवाचे उद्दिष्ट आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Video Viral: मडगावच्या दहीहंडीत आला 'पुष्पा'! "झुकेगा नही" म्हणत त्याने काय केलं, बघा...

Opinion: 3500 ईसापूर्व काळात सुमेरियन लोकांनी ‘क्यूनिफॉर्म’ लिपी विकसित केली, छापखान्याच्या शोधामुळे वाचनकलेत क्रांती झाली

Goa Live News: मोर्ले सत्तरी येथील वासू मोरजकर यांचे मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान

Vijayanagar Empire: राजा हरिहरच्या आदेशाने, बहामनी सल्तनतीकडून गोवा जिंकले; राजा अच्युतदेवरायाचा दुर्लक्षित इतिहास

Horoscope: मंगळ करणार 'त्रिगुणी संचार'!! सुरु होणार धन, सुख आणि समृद्धीचा प्रवाह; 3 राशींना मिळणार फायदा

SCROLL FOR NEXT