Aqua Goa Mega Fish Festival 2025: पणजीत भरणार दोन दिवसीय फिश फेस्टिव्हल; जाणून घ्या वेळापत्रक

Mega Fish Festival Flag Off Ceremony: मुख्यमंत्र्यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत सोहळ्याचा प्रचार करणाऱ्या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला.
CM Dr. Pramod Sawant
Goa Mega Fish Festival 2025Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: वार्षिक अ‍ॅक्वा गोवा मेगा फिश फेस्टिव्हलच्या ८व्या आवृत्तीची सुरुवात होणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते गुरुवार (२ जानेवारी २०२५) रोजी ऍक्वा गोवा फिश फेस्टोव्हलची फ्लॅग ऑफ महोत्सव पार पडला, यावेळी मत्स्यव्यवसाय मंत्री नीळकंठ हळर्णकर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत सोहळ्याचा प्रचार करणाऱ्या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला.

गोव्यात १० आणि १२ जानेवारी असे दोन दिवस कंपाल, पणजी येथे हा कार्यक्रम होणार आहे. महोत्सवात सागरी विश्वातील विविध जाती प्रजातीचे मासे पाहायला मिळतील. नागरिकांना एकाच ठिकाणी विविध जातीचे मासे पाहता येणार आहेत.

CM Dr. Pramod Sawant
Aqua Goa Mega Fish Festival 2024: पणजीत फिश फेस्टिव्हलला सुरुवात; नानाविध मासे अन् सी फूडची मेजवानी

स्वयंपूर्ण गोव्याच्या दृष्टीने सुरु असलेल्या वाटचालीत गोव्यातील मत्स्य व्यवसाय देखील समृद्ध होणं तेवढंच महत्वाचं आहे. राज्यात सुरु असलेल्या पारंपरिक मत्स्य व्यव्यसायाला जोड मिळावी तसेच स्थानिकांमध्ये या व्यवस्याबद्दल आणखीन जागरूकता निर्माण व्हावी म्हणून मत्स्य व्यवसाय विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. तरुणांना मत्स्य व्यवसायाबद्दल आवड निर्माण व्हावी म्हणून दरवर्षी हा सोहळा आयोजित केला जातो असं मुख्यमंत्री सावंत दरम्यान म्हणालेत.

गुरुवारी या महोत्सवाच्या निमित्ताने गावागावांमध्ये एक व्हॅन फिरेल आणि या व्हॅनद्वारे ऍक्वा गोवा मेगा फिश फेस्टिव्हलबद्दल जागृती केली जाणार आहे. याचा प्रमुख उद्देश गोव्यातील मत्स्य व्यवयसाबाद्ल माहिती देणं हाच असेल. दोन दिवस होणाऱ्या या महोत्सवामध्ये मत्स्य व्यवसाय, खाद्यपदार्थ तसेच विद्यार्थ्यांसाठी विविध सेमिनार आयोजित केले जाणार आहेत.

अधिकाधिक युवा या महोत्सवाला सहभागी होणं हे ब्ल्यू इकॉनॉमीच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण असेल, गोवा हे किनारी राज्य असल्याने अशा उपक्रमांमुळे नक्कीच राज्यात मस्त्य व्यवसायाबद्दल जागृती निर्माण व्हायला मदत मिळेल आणि आर्थिक बाजू आणखीन भक्कम होईल असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com