Rohan khaunte Dainik Gomantak
गोवा

Goa Taxi App: सर्व टॅक्सी व्यावसायिकांना विश्वासात घेऊन ॲपची अंमलबजावणी करण्यात येईल; रोहन खंवटे

सर्वच आमदार आणि टॅक्सी व्यावसायिकांना विश्वासात घेऊन पुढील वर्षापासून ॲपची अंमलबजावणी करण्यात येईल" असे अश्वासन पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी दिले

दैनिक गोमन्तक

पणजी: गोवा टॅक्सी अॅप हे गोव्यातील टॅक्सी मालकांसाठीच असेल, असे अश्वासन पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी दिले, ते पुढे म्हणाले "सर्वच आमदार आणि टॅक्सी व्यावसायिकांना विश्वासात घेऊन पुढील वर्षापासून ॲपची अंमलबजावणी करण्यात येईल".

(app will be implemented keeping all taxi professionals in confidence says Rohan Khanate)

गोवा सरकार लवकरच लॉन्च करणार नवं टॅक्सी अॅप

गोवा सरकार लवकरच 'गोवा टॅक्सी' नावाचं अॅप लॉन्च करणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, पर्यटन मंत्री रोहन खंवटे, आणि माविन गुदिन्हो यांची गोव्यातील टॅक्सी प्रश्नावर बैठक झाली. या बैठकीत नवीन अॅप लॉन्च करण्याबाबत चर्चा करण्यात आली. त्यामुळे येत्या काही दिवसात गोव्यात पर्यटकांसह सर्वसामान्य गोवेकरांनाही अॅप बेस्ड टॅक्सीचा अनुभव घेता येणार आहे.

नववर्षाआधीच हे अॅप लॉन्च करण्याचा सरकारचा मानस

गोवा सरकारचं वाहतूक खातं आणि पर्यटन खातं मिळून हे खास टॅक्सी अॅप तयार करणार आहेत. या अॅपच्या कामासाठी एका कंपनीसोबत बोलणीही सुरु असून गोवा इलेक्ट्रॉनिक लिमिटेड ही कंपनी नवीन टॅक्सी अॅप तयार करणार आहे. नववर्षाआधीच हे अॅप लॉन्च करण्याचा सरकारचा मानस असून या अॅपमध्ये गोव्यातील सर्व टॅक्सीचालकांना सामावून घेतलं जाणार असल्याचं माविन गुदिन्हो यांनी स्पष्ट केलं.

अॅप बेस्ड टॅक्सी सेवा काउंटरचा शुभारंभ सोमवारी 17 ऑक्टोबर रोजी

दरम्यान गोवा माईल्स या अॅप बेस्ड टॅक्सी सेवा काउंटरचा शुभारंभ सोमवारी 17 ऑक्टोबर रोजी दाबोळी येथील गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळावर करण्यात आला. वाहतूक मंत्री मॉविन गुदिन्हो यांच्या हस्ते करण्यात या सेवेला सुरुवात करण्यात आली आहे.

गोवा माईल्स काऊंटरच्या उद्घाटनापूर्वी एकाने या काऊंटरला विरोध करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्याला अटक करत 151 कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

Ranji Trophy 2026: पिठिया-भार्गवच्या फिरकीपुढे गोव्याची शरणागती! बडोद्याचा डाव व 135 धावांनी दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT