Goa Government: कामगारांच्या किमान वेतनात लवकरच सुधारणा केली जाईल; बाबूश मोन्सेरात

राज्य सरकारने आश्वासनानुसार कामगारांच्या किमान वेतनात सुधारणा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, अशी माहिती कामगार मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी दिली.
Babush Monserrate
Babush MonserrateDainik Gomantak

गोवा: राज्य सरकारने आश्वासनानुसार कामगारांच्या किमान वेतनात सुधारणा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, अशी माहिती कामगार मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी दिली. बांधकाम आणि इतर कामांमधील अकुशल कामगारांचे किमान वेतन सध्याच्या 307 रुपये अधिक 92 रुपये परिवर्तनीय महागाई भत्ता (VDA) वरून 523 रुपये अधिक 140 रुपये VDA ए क्षेत्रामध्ये वाढवण्याचा प्रस्ताव सरकारने मांडला आहे. अशी माहिती मोन्सेरात यांनी यावेळी दिली आहे.

(Minimum wages of unskilled labour will be revised soon Babush Monserrate)

Babush Monserrate
Mapusa Municipal Council: म्हापसा पालिका कर्मचारी उद्यापासून बेमुदत संपावर

सुधारित वेतनाचा मसुदा अधिसूचित केला जाईल आणि 60 दिवसांच्या कालावधीसाठी जनतेच्या सूचना आणि हरकतींसाठी खुला ठेवण्यात येईल, असे बाबूश म्हणाले.

60 दिवसांच्या कालावधीनंतर, मसुद्याच्या अधिसूचनेत बदल केले जातील आणि ते किमान वेतन सल्लागार मंडळासमोर मंजुरीसाठी ठेवण्यात येतील, अशी माहिती कामगार आयुक्त राजू गवस यांनी दिली. यानंतर नवीन वेतन अधिसूचित केले जाईल.

गोवा बांधकाम कामगार कल्याण निधी म्हणून 408 कोटी रुपये उपकर जमा

कामगार विभागाने गोवा बांधकाम कामगार कल्याण निधी अंतर्गत रिअल इस्टेट ऑपरेटरकडून 408 कोटी रुपयांचा उपकर वसूल केला आहे, अशी माहिती कामगार मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी दिली. "हा निधी मजुरांच्या कल्याणासाठी वापरला जाणार आहे. गोवा बांधकाम कामगार कल्याण निधी अंतर्गत कामगार कल्याण योजना तयार करण्यासाठी दिवाळीनंतर एक बैठक आयोजित करेल,” ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com