Goa taxi issue, App taxi protest Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Taxi Issue: नीज गोवेकरांची रोजीरोटी वाचवा! टॅक्सीचालकांची मागणी; ॲप टॅक्सीवाल्यांवर कारवाईसाठी दिले निवेदन

App Taxi Protest Goa: पेडा वार्का येथील येथील झुरी व्हाईट सेन्ड्स रिसॉर्ट या तारांकित हॉटेलच्या गेटसमोर टॅक्सीवाल्याच्या दादागिरीचा त्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला होता.

Sameer Panditrao

मडगाव: अॅप टॅक्सीवाल्यांवर कारवाई करावी, अशी मागणी वार्का येथील टॅक्सीवाल्यांनी केली आहे. सोमवारी या टॅक्सीवाल्यांसह बाणावलीचे आमदार वेन्झी व्हिएग्स व वॉरन आलेमाव यांनी दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक टिकम सिंग वर्मा यांना निवेदन सादर केले. 

नीज गोवेकर या व्यवसायावर अवलंबून आहेत. त्यांची रोजीरोटी हिरावून नेली जात आहे. नाहक आरोप केले जात असून हे प्रकार खपवून घेतले जाणार नसल्याचे यावेळी आमदार व्हिएग्स म्हणाले. मागच्या आठवड्यात विवाह सोहळा आटपून परत जात असताना, मूळ युकेतील पर्यटकांना टॅक्सीवाल्यांच्या मनमानीपणाला सामोरे जावे लागले होते.

पेडा वार्का येथील येथील झुरी व्हाईट सेन्ड्स रिसॉर्ट या तारांकित हॉटेलच्या गेटसमोर टॅक्सीवाल्याच्या दादागिरीचा त्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला होता. विमानतळावर जात असताना, त्यांच्या खासगी टॅक्सी अडवून ठेवण्यात आल्या. या प्रकरणाची गंभीर दखल कोलवा पोलिसांनी घेताना संशयितांवर गुन्हा नोंद केला होता. या पार्श्वभूमीवर सध्या  या भागात वातावरण तापले आहे.  

टॅक्सी चालकांवर गुन्हा नोंद

ऑलिव्हर फर्नांडिस, ब्रिटो फर्नांडिस, रेमी रॉड्रिगीस, संजय, टुरिस्ट टॅक्सी असोसिएशन वार्काचे अध्यक्ष सेबी व अन्य स्थानिक टॅक्सी चालकांवर पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून त्यांना चौकशीसाठी नोटीस बजाविली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.  या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींविरोधात कडक कारवाई करण्यात येईल, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT